लग्नाचं वय 18 असावं की 21?, आर्चीचं विचार करायला लावणारं उत्तर….!

मुंबई | मुलींच्या लग्नाच्या वयात बदल करण्याचे संकेत मोदी सरकारने दिले आहेत. मुलींच्या पोषणाच्या दृष्टीकोनातून त्यांच्या लग्नाचे वय बदल्याचे सरकारचे संकेत आहेत, असं कळतंय. यावरच मुलीच्या लग्नाचं वय 18 वरून 21 करण्यात यावं का?, मातृत्वाची देखील वयोमर्यादा असावी का? असे प्रश्न मराठी अभिनेत्री सैराट फेम रिंकू राजगुरू हिला विचारण्यात आले. तिने तिच्या खास शैलीत या प्रश्नांची उत्तरे दिली आहेत.

मुलींच्या लग्नाचं वय सध्या 18 आहे. पण केंद्र सरकारच्या नवीन प्रस्तावानुसार लग्नाचं वय 21 होणार असल्याच्या चर्चा आहेत. यावर लग्नाचं वय किती असावं हे मला सांगता येणार नाही पण वयावरती लग्न ठरू शकत नाही. जेव्हा मुलगी मनाने मोठी होती आणि लग्नासाठी ती प्रॉपर मनाने तयार असते तेव्हा तिने लग्न करावं, असं परिपक्व आणि सर्वांना विचार करायला लावणारं उत्तर रिंकूने दिलं आहे.

मुलींच्या लग्नाचं वय 18 वरून 21 करणं हा चांगला प्रस्ताव आहे. याने निश्चितच मुलींच्या शिक्षणाचा टक्का वाढायला  मदत होईल, असंही मत रिंकूने मांडलं आहे.

दुसरीकडे मुंबईच्या नाईट लाईफवरही रिंकू बोलती झाली. मी मुंबईत फारशी राहिली नाही. त्यामुळे मला नाईट लाईफ म्हणजे काय हे माहिती नाही. मी फक्त एवढचं ऐकलंय की मुंबई कधीच झोपत नाही. ती 24 तास जागीच असते. मी मुंबईच्या नाईट लाईफचं समर्थन करते की नाही याचं उत्तर मलाच माहिती नाही किंबहुना मला ते कळत नाही, असं रिंकू म्हणाली.

महत्त्वाच्या बातम्या-

-कागदोपत्री आकड्यांचा मेळ घालून सादर केलेला अर्थसंकल्प; धीरज देशमुखांची मोदी सरकारवर सडकून टीका

-लोणीकरांचं ते वक्तव्य आक्षेपार्हच… मी त्यांचं समर्थन करणार नाही- चित्रा वाघ

-गोंधळलेल्या अर्थमंत्र्यांनी गोंधळलेला अर्थसंकल्प मांडला- जयंत पाटील

-मोदी सरकारच्या बजेटवर रोहित पवारांचं टीकास्त्र; म्हणाले ‘हा तर गंडवागंडवीचा अर्थसंकल्प’!

-“नशिब ही गोष्ट जेवणापुर्ती मर्यादित राहिली नाहीतर गांधीजींच्या आत्म्यानं स्वर्गात आपलं चैतन्य गमावलं असतं”