मनोरंजन

आर्ची ऊर्फ रिंकू राजगुरुनं वजन घटवलं, व्हीडिओत दिसतेय स्लीमट्रीम

मुंबई : सैराट फेम रिंकू राजगुरू आपल्या नवीन चित्रपटाच्या तयारीला लागली आहे.  ‘कागर’ असं तिच्या नव्या चित्रपटाचं नाव आहे. नुकताच तिच्या अदांचा आणि नृत्याचा व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

शेअर केलेल्या व्हीडिओमध्ये रिंकू काही मुलींसोबत नाचताना दिसत आहे. शिवाय थक्क करायला लावणारी गोष्ट म्हणजे गोलमटोल दिसणाऱ्या रिंकूने तीचं वजन कमी केलं आहे. आता ती एकदम स्लीमट्रीम दिसत आहे.

तिचं हे नवं रुप पाहून अनेकांना तिनं भूरळ घातली आहे. आर्ची खूप सुंदर दिसतेय, अशा प्रकारच्या प्रतिक्रिया येत आहेत. 

दरम्यान, ‘कागर’मध्ये रिंकू ही मुख्य भूमिकेत दिसणार आहे. चित्रपट लवकरच येत असून त्याची तयारी जोरात चालू आहे. या चित्रपटात तिचा हिरो कोण असणार हे अद्याप कळू शकलेलं नाही. 

IMPIMP