सोन्याच्या दरांमध्ये पुन्हा वाढ! जाणून घ्या आजचा बाजारभाव

मुंबई | सोने आणि चांदीच्या दरात सातत्याने घसरण पाहायला मिळत होती. सोन्याची किंमत गेल्या अनेक महिन्यांतील निच्चांकी पातळीवर होती पण बुधवारी या किंमती वाढल्याचं लक्षात आलं आहे. मुंबईमध्ये 24 कॅरेट सोन्याची किंमत प्रतितोळा 48,940 रुपये आहे.

मुंबईत 24 कॅरेट सोन्याची किंमत 48,940 रुपये प्रतितोळा आहे. मंगळवारी ऑक्टोबर डिलिव्हरीच्या सोन्याचा दर सध्या प्रतितोळा 48,590 इतका होता.

पुण्यात 22 कॅरेट सोन्याचा प्रतितोळा दर 44,940 असेल तर 24 कॅरेट सोन्याचा दर 48,630 रुपये असेल. नागपूरमध्ये 22 कॅरेट सोन्याचा दर 45680 तर 24 कॅरेट सोन्याचा दर 46940 रुपये प्रतितोळा इतका आहे.

सध्या सोनं 45 ते 50 हजार रुपये प्रतितोळा या पातळीवर आहे. ही सोने खरेदीसाठी चांगली संधी असल्याचे मानले जात आहे. पुढील तीन महिन्यांत येथून सोन्याच्या किंमतीत 4-5 हजारांपर्यंत वाढ शक्य आहे. स्वस्तिक इन्व्हेस्टमेंटचे अभिषेक चौहान यांच्या अंदाजानुसार दिवाळीपर्यंत सोन्याचा भाव 50 हजारावर पोहोचू शकतो.

पुढील तीन महिन्यांत चांदीचा भाव सध्याच्या पातळीपासून 10 हजारांपर्यंत वर जाऊ शकतो. गेल्या आठवड्यात, मार्च 2022 च्या डिलिव्हरीसाठी चांदीचा बंद भाव 60,967 रुपये प्रति किलो होता.

दरम्यान, गंगानगर कमोडिटी लिमिटेडचे ​​अमित खरे म्हणाले की, चीनमधील वीज संकटामुळे बाजारावर दबाव आहे. जर हे जास्त काळ चाललं, तर शेअर बाजारातील गुंतवणूकदार सोन्याकडे आकर्षित होतील. कारण कच्च्या तेलाच्या किंमतीतही सातत्याने वाढ होत आहे.

महत्त्वाच्या बातम्या 

 RTPCR चाचणी निगेटिव्ह आली तरी लक्षणं दिसताय?; मग ‘हे’ कारण असू शकतं

  पैशांसोबतच बायकोकडे ‘या’ गोष्टींची मागणी करणंही गुन्हा; सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय

 राज्यात कडाक्याची थंडी! पुढील 3-4 दिवसांत तापमानाचा पारा आणखी घसरणार

  ‘Omicron ला बूस्टर डोस सुद्धा रोखू शकत नाही, सर्वांना…’; तज्ज्ञांच्या दाव्याने खळबळ

मुंबईकरांसाठी दिलासादायक बातमी; टास्क फोर्सच्या सदस्यांनी दिली महत्वाची माहिती