पेट्रोल-डिझेलच्या किंमतीमध्ये वाढ, पाहा आजचा दर

मुंबई | कोरोना संसर्ग रोगाने सगळीकडे थैमान घातलं होत. जवळजवळ त्याला आता दोन वर्ष होतील. त्याकाळात सरकारने लॉकडाऊनही जाहीर केलं होतं. परंतू लॉकडाऊन उठवल्यानंतर बऱ्याच वस्तूंच्या किंमतीही वाढल्या असल्याचं पाहायला मिळलं होतं.

यामध्ये पेट्रोल-डिझेलचाही समावेश झाला होता. महत्वाची बाब म्हणजे अजूनही या किंमती वाढतच चालल्या आहेत. मागिल काही दिवसांपासून पेट्रोल-डिझेलच्या दरांमध्ये सतत वाढ झालेली पाहायला मिळतं आहे.

त्यामुळे सर्वसामान्य लोकांसाठी पेट्रोल-डिझेलच्या किंमती हा चिंतेचा विषय बनला आहे. गेल्या काही दिवसांपासून पेट्रोल-डिझेलच्या किंमतीमध्ये चांगलीच वाढ होताना दिसत आहे.

शनिवार म्हणजेच 23 ऑक्टोबर रोजी पेट्रोलियम कंपन्यांनी जाहीर केलेल्या आकडेवारीनूसार, पेट्रोल आणि डिझेल प्रति लिटरच्या किंमतीमध्ये तब्बल 30ते 35 पैशांची वाढ झाली आहे.

मुंबईमध्ये पेट्रोलचा प्रतिलीटर दरात 30 पैशांची वाढ झाली असून, पेट्रोलचा प्रतिलीटरचा दर 113.08 रूपये इतका आहे. तर डिझेलच्या दरामध्ये 35 पैशांची वाढ झाली आहे. त्यामुळे डिझेलचा प्रती लिटर दर 103.97 रूपये आहे. तसेच दिल्लीमध्ये पेट्रोल प्रति लीटर 107.24 रूपये आहे आणि डिझेलचा दर 95.98 रुपये आहे.

महत्वाच्या बातम्या-

हवामान खात्याचा सतर्कतेचा इशारा! 26 ऑक्टोबरपासून ‘या’ भागात पाऊसाची शक्यता

सोन्याच्या दरात झाली ‘इतक्या’ रूपयांची घट, वाचा आजचा दर

महिला चक्क भल्यामोठ्या अजगराला खेळवतीय खांद्यावर अन्…, पाहा काळजाचं पाणी करणारा व्हिडीओ

सोन्याच्या दरात तब्बल ‘इतक्या’ रूपयांची घसरण, वाचा आजचा दर

“संजय राऊतांची उच्च प्रतिच्या गांजाची नशा अजून उतरली नाही का?”