खेळ

हिमा दासने केलेल्या सुवर्ण कामगिरीबद्दल रिषभ पंत म्हणतो…

नवी दिल्ली : भारताची स्टार धावपटू हिमा दासने केलेल्या कामगिरीबद्दल संपूर्ण देशभरातून तिच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. आता भारताचा युवा खेळाडू रिषभ पंत यानेही हिमा दासचंं कौतुक केलं आहे. 

रिषभ पंत याने ‘सलाम बॉस’ असं म्हणत हिमा दासच्या कामगिरीची प्रशंसा केलीये. तु प्रेरणादायी आहेस… भारताची सुवर्णकन्या,’सलाम बॉस…!’ असं ट्वीट करत रिषभने हिमाला शुभेच्छा दिल्या आहेत. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि अमिताभ बच्चन यांनी हिमाचे ट्वीटरवरून अभिनंदन केलं आहे. हिमा दासने गेल्या 20 दिवसात वेगवेगळ्या स्पर्धेत 5 सुवर्णपदकांची कमाई करत इतिहास रचला आहे.

हिमाने 2 जुलैला युरोपमध्ये, 7 जुलैला कुंठो अ‌ॅथलेटिक्समध्ये, 13 जुलैला चेक गणराज्यात, 17 जुलैला टाबोर ग्रँड प्रिक्समध्ये तर 20 जुलैला चेक रिपब्लिक अशा वेगवेगळ्या स्पर्धेत सुवर्णपदकं मिळवलं आहेत.

दरम्यान, 20 दिवसात 5 सुवर्णपदकं मिळवणारी हिमा दास भारताची पहिली महिला धावपटू ठरली आहे. 

महत्वाच्या बातम्या-

-मराठा आरक्षणासाठी बलिदान देणाऱ्या काकासाहेब शिंदेंचा गोदातीरी बसवला पुतळा!

-…नाहीतर भाजपचाच काँग्रेस होईल; चंद्रकांत पाटलांचा काळजीचा सूर

-बीडमध्ये काँग्रेस-राष्ट्रवादीला झटका; हे दोन महत्वाचे नेते करणार वंचितमध्ये प्रवेश??

-राष्ट्रवादीच्या ‘या’ आमदारांना आता खावी लागणार जेलची हवा!

-राज ठाकरेंकडून काय धडा घेतला??? आदित्य ठाकरे म्हणतात…

IMPIMP