महाराष्ट्र मुंबई

पूरग्रस्तांच्या मदतीसाठी रितेश देशमुखने केली 25 लाखांची मदत

मुंबई : पश्चिम महाराष्ट्रातील महापूरातील लोकांना महाराष्ट्रासह अनेक राज्यातील लोकांनी मदत केली आहे. कोल्हापूर, सांगली, सातारा, कोकण या भागात पूराने त्या भागातील लोकांचे जनजीवन पूर्णपणे विस्कळित केले आहे. तेथिल पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी कलाकार मंडळी पुढे सरसावली आहे. मराठमोळा अभिनेता रितेश देशमुख आणि अभिनेत्री जेनेलिया देशमुख यांनी 25 लाख रुपयांची मदत केली आहे. 

सोमवारी रितेश आणि जेनेलिया यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली. त्यांनी 25 लाख रुपयांची चेक मुख्यमंत्री सहायता निधीसाठी दिला आहे, अशी माहिती देणारं मुख्यमंत्र्यांनी ट्वीट केलं आहे.

रितेश आणि जेनेलिया यांनी पूरग्रस्तांना केलेल्या मदतीसाठी मुख्यमंत्र्यांनी त्या दोघांचेही आभार मानले आहेत.

पश्चिम महाराष्ट्रात पूरामुळे लाखो कुटुंबांचा संसार उघड्यावर पडला आहे. सरकार, सामाजिक संस्थांकडूनही मदतीचा ओघ कायम सुरु आहे. त्यातच कलाकारांनीही मदतीचा हात पुढे केला आहे.

पूराच्या महासंकटात सापडलेल्या नागरीकांना लवकरच मदत करण्यात येईल. त्याचे स्वरुप दोन दिवसांत जाहीर करु, असं मराठी कलाकार सुबोध भावे म्हणाला आहे. त्याने फेसबूक पोस्टच्या माध्यमातून त्याने ही माहिती दिली आहे. 

दरम्यान, पश्चिम महाराष्ट्रातील पूर हळूहळू ओसरत आहे. तरीही पूरग्रस्तांना मदतीची गरज आहे. 

महत्वाच्या बातम्या-

-अकोट विधानसभा मतदारसंघात स्थानिक उमेेदवारीसाठी भाजपकडून कँम्पेन

-“माझे अनेक मित्र पाकिस्तानी आहेत पण मी देशभक्त आहे”

-काश्मीरला वाचवणं आपलं कर्तव्य आहे- दिग्विजय सिंह

-मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी ‘या’ अभिनेत्रीने दुसऱ्या पतीविरोधात घेतली पोलिसात धाव

-भारताचा वेस्ट इंडीजवर 59 धावांनी विजय

IMPIMP