महाराष्ट्र मुंबई

‘बाबा तुमची नेहमी आठवण येते’; विलासरावांच्या आठवणीत रितेश भावूक, पाहा व्हिडिओ

मुंबई | महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांची आज 75 वी जयंती आहे. वडिलांच्या जयंतीनिमित्त रितेश देशमुख भावनिक झाला आहे. रितेशने एक भावनिक व्हिडिओ शेअर केला आहे.

विलासरावांच्या पोषाखाला बिलगून रितेश त्यांचं अस्तित्व जाणवून घेताना दिसत आहे. रितेश देशमुख यावेळी भावनिक झाला असून डोळ्यावर अश्रू तरळताना दिसून येत आहेत.

‘अभी मुझमे कही बाकी है थोडीसी जिंदगी’ या गाण्याच्या पार्श्वभूमीवर रितेशने हा व्हिडिओ तयार केला असून आपल्या अधिकृत ट्विटर खात्यावर शेअर केला आहे. व्हिडिओ संपताना अखेरीस विलासरावांचा फोटोही दिसतोय. रितेशने हा व्हिडीओ शेअर करताना तुमची नेहमी आठवण येते, असं लिहिलं आहे.

सोशल मीडियाच्या माध्यमातून रितेश देशमुख नेहमीच वडिलांच्या आठवणींना उजाळा देत असतो. यावेळी रितेशने शेअर केलेला व्हिडिओ अनेकांचे डोळे पाणावणारा आहे.

 

महत्वाच्या बातम्या-

-विमानातून आलेल्या ‘भावा’ला सन्मानाने पाठवलं, आम्ही अजून काय करायला हवं?- शाहिद आफ्रिदी

-“नारायण राणे शिवसेनेमुळे मोठे झाले अणि शिवसेनेमुळेच रस्त्यावरही आले”

-माजी रेल्वेमंत्री लालूप्रसाद यादवांचा पियुष गोयलांना टोला, म्हणाले…

-भाजपमधील माणसं सत्तेसाठी हपापलेली आहेत- पृथ्वीराज चव्हाण

-महाविकास आघाडी सरकार सध्या स्थिर आहे पण….- सुधीर मुनगंटीवार