सोशल मीडियावर व्हायरल होणारी कागदपत्रे चुकीच्या उद्धेशाने पसरवली जात आहेत- रितेश देशमुख

लातूर | लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने अमित देशमुख आणि रितेश देशमुख यांना लातूर जिल्ह्यातील सारसा येथील 11 एकर जमिनीवर 4 कोटी 70 लाख रुपयांचे कर्ज दिल्याची कागदपत्रे सोशल मीडियावर व्हायरल होत होती. अभिनेता रितेश देशमुख याने यावर खुलासा दिला आहे.

सोशल मीडियावर व्हायरल होणारी कागदपत्रे चुकीच्या उद्धेशाने पसरवली जात आहेत. मी किंवा माझे मोठे बंधू अमित देशमुख यांनी कोणतही कर्ज घेतलेलं नाही. त्यामुळे कर्जमाफीचा प्रश्नच उद्भवत नाही. कृपया गैरसमज करुन घेऊ नका, असं रितेशनं म्हटलं आहे. त्याने ट्विट करुन हा खुलासा केला आहे.

सामाजिक कार्यकर्त्या मधू किश्चर यांनी यासंबंधीची कागदपत्रे सोशल मीडियावर पोस्ट केली होती. मात्र, रितेश देशमुखच्या ट्विटनंतर त्यांनी ही पोस्ट डिलीट केली होती. पण या कागदपत्रांमुळे देशमुख बंधुंची बदनामी सुरु झाली होती.

दरम्यान, लातूर शहर आणि लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघातून अनुक्रमे अमित देशमुख व धीरज देशमुख आमदार म्हणून निवडून आले आहेत.

 

महत्त्वाच्या बातम्या-