रिया आणि महेश भट्ट यांच व्हॉट्सअॅप चॅट समोर आल्यानं सुशांत प्रकरणाला नवं वळण

मुंबई | बॉलीवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत प्रकरण सर्वोच्च न्यायालयानं सीबीआयच्या हाती सोपवलं आहे. याप्रकरणी सीबीआयनं आपला तपास सुरु केला असून गुरुवारी सीबीआय अधिकाऱ्यांची टीम मुंबईत दाखल झाली आहे. अशातच आता सुशांतची कथित एक्स गर्लफ्रेंड रिया चक्रवर्ती आणि दिग्दर्शक महेश भट्ट यांच व्हॉट्सअॅप चॅट समोर आल्यानं याप्रकरणाला नवं वळण मिळालं आहे.

रिया चक्रवर्तीनं 8 जून रोजी महेश भट्ट यांना व्हॉट्सअॅपवरून मेसेज केले होते. आयेशा मुव्ह ऑन, असं रियानं या मेसेजमध्ये लिहलं होतं. ‘जलेबी’ या चित्रपटामध्ये रियानं आयेशाची भूमिका साकारली होती. तसेच मी जड अंतकरणानं पुढे जात आहे,  असंही रिया यावेळी महेश भट्ट यांना म्हणाली होती.

तुझे वडील या निर्णयानं खूप खुश होतील. आता मागे वळून पाहू नको. जे अपरिहार्य आहे ते शक्य करा, असं उत्तर महेश भट्ट यांनी यावेळी रियाला दिलं होतं.

तुमच्याशी बोलल्यामुळे मला धैर्य मिळालं आहे. माझ्या वडिलांविषयी ज्या गोष्टी तुम्ही बोललात त्यामुळे मला कणखर होण्यास मदत झाली आहे, असंही रिया यावेळी महेश भट्ट यांना व्हॉट्सअॅपवर म्हटली होती.

महत्वाच्या बातम्या-

“गृहमंत्र्यावर चिखलफेक करनाऱ्यांनो फडणवीस मुख्यमंत्री असताना वर्षावर कुख्यात गुंड भेटल्याची बातमी महाराष्ट्राने पाहिली”

…हा तर उद्धव ठाकरे सरकारला जबरदस्त झटका- बबिता फोगट

गेल्या 70 वर्षात नाही झालं ते येत्या सात ते आठ महिन्यात होणार- राहुल गांधी

‘…तेव्हा मराठी कलाकार नाही दिसले त्यावेळी दिशा, जॅकलीनस पाहिजे असतात’; राणेंचं जोरदार टीकास्त्र!

“दाभोलकरांना मारण्यात आलं तेव्हा गृहखात राष्ट्रवादीकडेच होतं, तुमच्याच सरकारने पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला”