Top news मनोरंजन

सुशांत प्रकरणात आता रितेश देशमुखची उडी! रियाला पाठींबा देत म्हणाला…

नवी दिल्ली | अभिनेता सुशांत सिंह राजपूतनं 14 जून रोजी आत्मह.त्या केली. सुशांत प्रकरणी सुशांतच्या वडिलांनी रिया चक्रवर्ती आणि तिच्या कुटुंबावर अनेक आरोप केले होते. त्यानंतर बॉलिवूडमधील ड्र.ग्ज कनेक्शन समोर आलं आणि अनेक बॉलीवूड अभिनेते अं.मली पदार्थ प्रकरणी एनसीबीच्या रडारवर आले.

अं.मली पदार्थ प्रकरणी अ.टक केलेल्या रिया चक्रवर्तीला नुकतंच मुंबई उच्च न्यायालयातुन जा.मीन मिळाला आहे. आता ज्या लोकांनी रिया चक्रवर्तीवर सुशांत प्रकरणी खोटे आरोप केले होते, त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याचे रियाच्या वकिलांनी ठरवले आहे.

रिया चक्रवर्तीने सीबीआयकडे त्यांच्या शेजारी राहणाऱ्यांवर कारवाई करण्याची विनंती केली आहे. कारण त्यांनी मीडियाला खोटे विधान देऊन केस दुसऱ्याच दिशेला नेण्याचा प्रयत्न केला होता.

या गोष्टीबाबत अभिनेता रितेश देशमुख यांनीही रिया चक्रवर्तीला समर्थन दिले आहे. पीटीआयच्या अहवालानुसार रिया चक्रवर्ती हिने सीबीआय स्पेशल टीमच्या प्रमुख नुपूर शर्मा यांना पत्र लिहिले आहे.

त्यात रिया चक्रवर्ती हिने लिहिलंय की, माझ्या शेजारी राहणाऱ्या डिम्पल थवानी यांनी खोटा दावा केला होता की, सुशांत मला 13 जूनला घरी सोडवायला आला होता.

रिया चक्रवर्तीने हे पत्र तिचे वकील सतीश मान शिंदे यांच्याद्वारे सीबीआयकडे दिला आहे. त्या पत्रात तिने पुढे लिहिलंय की, अशा घटनांमध्ये भारतीय दंड संहितेच्या 203 कलमानुसार कोणत्याही प्रकरणात खोटी साक्ष देणे आणि 211 कलमानुसार नुकसान पोहोचवण्याच्या उद्देशाने खोटा आरोप करणे हे दोन्ही अपराध आहे. यासाठी सात वर्षाची शिक्षा होऊ शकते.

रिया चक्रवर्तीने उचललेल्या या पावलाला रितेश देशमुखने साथ दिली आहे. त्याने ट्वीट करत रियाला पाठींबा दिला आहे. त्याने ट्वीटमध्ये म्हटलंय की, तुम्हाला अजून शक्ती मिळो. सत्यापेक्षा अधिक ताकत कशातच नाही.

रिया चक्रवर्ती आणि तिच्या कुटुंबाविरुद्ध सुशांतचे वडील केके सिंह यांनी पटणामध्ये पोलीस स्थानकात जाऊन तक्रार केली होती. रिया चक्रवर्ती हिच्यावर आ.त्मह.त्या करण्यासाठी प्रवृत्त केल्याचा आरोप त्यांनी केला होता.

बिहार सरकारच्या शिफारसीनंतर केंद्र सरकारने ही केस सीबीआयकडे चौकशीसाठी दिली होती. अं.मली पदार्थ प्रकरणी रियाविरुद्ध पुरावे मिळाल्यानं  एन.सी.बीने रिया चक्रवर्तीला 8 सप्टेंबर रोजी अ.टक केली होती. 7 ऑक्टोबर रोजी रिया चक्रवर्तीला मुंबई उच्च न्यायालयातुन जामीन मिळाला आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

मित्रांच्या मदतीने त्याला मिळाले नवीन आयुष्याचे गिफ्ट; सोनू सूदही मदतीसाठी धावला

सुशांत प्रकरणी आता अमित शहांनी देखील सोडलं मौन; महाराष्ट्र सरकारवर आरोप करत म्हणाले..

‘केबीसी’तील अमिताभ बच्चन यांचा ‘तो’ प्रसिध्द डायलॉग कोणी लिहिला आहे? वाचा सविस्तर

कौतुकास्पद! या जोडप्यानं लग्न खर्च वाचवून तब्बल 500 श्वानांना केली ‘अशी’ मदत

काय सांगता! कोरोनाकाळात तब्बल ‘एवढ्या’ सायकली विकल्या गेल्या