Top news मनोरंजन

“सुशांतच्या मृ.त्युच्या आदल्या दिवशी रिया सुशांतला भेटली होती!”

मुंबई | अभिनेता सुशांत सिंह राजपूत प्रकरणातील गुंता दिवसेंदिवस वाढतंच चालला आहे. सुशांत प्रकरणाला आत्तापर्यंत अनेक वेगवेगळी वळणं मिळाली आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार सीबीआय सुशांत प्रकरणाचा शोध लावण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र, अद्याप सुशांतची ह.त्या करण्यात आली होती की सुशांतनं आ.त्मह.त्या केली होती हे स्पष्ट झालेलं नाही.

सुशांत प्रकरणी सुशांतची एक्स गर्लफ्रेंड रिया चक्रवर्ती सुरुवातीपासूनच वा.दाच्या घेऱ्यात सापडली आहे. सुशांतच्या मृ.त्युसंबंधित्त रिया चक्रवर्तीवर अनेक आ.रोप करण्यात येत आहेत. सुशांतच्या कुटुंबियांनी सुद्धा रियावर अनेक आ.रोप केले आहेत. अशातच आता याप्रकरणी महत्वाची माहिती समोर आली आहे.

8 जूनला सुशांतचं घर सोडल्यानंतर मी पुन्हा त्याला केव्हाच भेटली नव्हती, असं रिया सीबीआय चौकशी दरम्यान सातत्यानं सांगत होती. मात्र सुशांत सिंह राजपूतच्या मृ.त्युच्या आदल्या दिवशी म्हणजेच 13 जूनला रिया सुशांतला भेटली होती, असा खुलासा एका साक्षीदारानं केला आहे. सुशांतची बहिण श्वेता कीर्ती सिंहनं ट्वीट करत ही माहिती दिली आहे.

ही एक गेमचेंजर बातमी आहे. 13 जूनच्या रात्री रिया चक्रवर्ती माझ्या भावाला भेटली होती, हे सांगणारा एक साक्षीदार भेटला आहे.  नेमकं 13 जूनच्या त्या रात्री असं काय घडलं होतं ज्यामुळे दुसऱ्या दिवशी सकाळी माझा भाऊ मृ.तावस्थेत सापडला होता?, असा सवाल श्वेता कीर्ती सिंहनं केला आहे.

8 जूनला सुशांत आणि माझ्यात वा.द झाल्यानं मी 8 तारखेलाच सुशांतचं घर सोडलं होतं. यानंतर सुशांतची बहिण मितू त्याच्यासोबत राहत होती. 8 जूननंतर मी सुशांतला केव्हाच भेटलेली नाही, असं रियानं म्हटलं होतं. मात्र, सुशांत प्रकरणी समोर आलेल्या या नव्या माहितीनं रियाच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.

दरम्यान,  रिया चक्रवर्तीच्या मोबाईल मध्ये सीबीआयला अं.मली पदार्थांचा उल्लेख आढळला होता. यानंतर एनसीबीनं रियाला ता.ब्यात घेत याप्रकरणी शोध सुरू केला होता. रियाच्या अ.टकेनंतर याप्रकरणी बॉलिवूड इंडस्ट्रीतील अनेक दिग्गजांची नावे समोर आली आहेत. तसेच काही ड्र.ग्ज पेड.लर्सलाही एनसीबीनं ता.ब्यात घेतलं आहे.

अभिनेत्री श्रद्धा कपूर, दीपिका पदुकोण, नम्रता शिरोडकर आणि सारा अली खान यांचीही नावे अं.मली पदार्थ प्रकरणी समोर आली आहेत. शनिवारी एनसीबीनं सारा अली खान, श्रद्धा कपूर आणि दीपिका पादुकोन यांना चौकशीसाठी एनसीबी कार्यालयात बोलावलं होतं.

तसेच अभिनेता शाहरुख खान, अर्जुन रामपाल, रणबीर कपूर आणि डिनो मोरिया या बड्या कलाकारांचीही नावे अं.मली पदार्थ प्रकरणी समोर आली आहेत. अं.मली पदार्थ प्रकरणी या बड्या कलाकारांची नावे समोर आल्यानं इंडस्ट्रीमध्ये एकच खळबळ उडाली आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

रियाचा 10 वर्षे तुरुं.गवास अटळ? रियाच्या घरी एनसीबीला सापडली ‘ही’ धक्कादायक गोष्ट!

एका माशानं तिला केलं लखपती; मिळालेली रक्कम ऐकून हैराण व्हाल!

कोरोनाबाबत अत्यंत मोठी घडामोड; अशा प्रकारे कोरोनाचा आता हवेतच खात्मा होणार!

“हे न.शेत जगणारे नर्कातील किडे आहेत, यांना कोण आपला आदर्श समजणारय?”

ड्र.ग्ज प्रकरणी धक्कादायक बातमी! एनसीबी अधिकाऱ्यानं केला ‘या’ चार बड्या अभिनेत्यांच्या नावांचा खुलासा