Top news मनोरंजन

‘रिया शिवसेनेच्या ‘या’ मंत्र्याच्या संपर्कात होती’; सुशांतच्या मित्राचा धक्कादायक खुलासा!

मुंबई | अभिनेता सुशांत सिंह राजपूत प्रकरणातील गुंता दिवसेंदिवस वाढतंच चालला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार सीबीआय याप्रकरणी तपास करत आहे. सुशांतच्या मृ.त्यूसंबंधीत सुशांतचे स्नेही, कुटुंबीय, मित्र, प्रत्येक्षदर्शी असे बरेच लोक रोज नवनवीन गोष्टींचा खुलासा करत आहेत. अशातच आता सुशांतचा मित्र सुनील शुक्ला याने सुशांत प्रकरणी महत्वाचा खुलासा केला आहे.

सुशांतची कथित एक्स गर्लफ्रेंड रिया चक्रवर्ती सुरुवातीपासून सुशांत प्रकरणी वा.दाच्या घेऱ्यात सापडली आहे. रियावर सुशांतच्या कुटुंबियांनी अनेक आरोप केले आहेत. तसेच सुशांत प्रकरणात शिवसेनेचा एक नेता सामील असल्याचं सुद्धा सातत्यानं बोललं जात होतं. अशातच आता सुनील शुक्ला याने रिया चक्रवर्ती शिवसेनेच्या एका मंत्र्याच्या संपर्कात होती, असा खुलासा केला आहे.

रिया चक्रवर्तीला लोणावळा येथील पवना लेक शेजारी जमीन खरेदी करायची होती. ही जमीन महाराष्ट्र फॉरेस्ट डिपार्टमेंटच्या क्षेत्रात येते. यामुळे ही जमीन खरेदी करण्यासाठी रिया चक्रवर्ती शिवसेना मंत्री संजय राठोड यांच्या संपर्कात होती, असा खुलासा सुनीलनं केला आहे.

लोणावळ्यातील जमीन खरेदी करण्यासाठी रियानं संजय राठोड यांच्याशी बातचीत केली होती. मात्र, त्यानंतर कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन लागू करण्यात आलं. यामुळे हे डील होऊ शकलं नाही, अशी माहिती सुनीलनं दिली आहे.

सीबीआयनं रिया चक्रवर्ती आणि सुनील शुक्ला यांच्यातील या डील विषयी सुद्धा शोध घ्यावा, अशी मागणी सुनील शुक्लानं केली आहे. शिवसेना मंत्री संजय राठोड यांनी अद्याप याप्रकरणावर कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. मात्र, सुनीलनं दिलेल्या माहितीत तथ्य आढळल्यास रियाच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.

दरम्यान, रिया चक्रवर्तीच्या मोबाईल मध्ये सीबीआयला अं.मली पदार्थांचा उल्लेख आढळला होता. यानंतर एनसीबीनं रियाला ता.ब्यात घेत अं.मली पदार्थ प्रकरणी शोध सुरू केला होता. रियाच्या अ.टकेनंतर याप्रकरणी बॉलिवूड इंडस्ट्रीतील अनेक दिग्गजांची नावे समोर आली आहेत. तसेच काही ड्र.ग्ज पेड.लर्सलाही एनसीबीनं ता.ब्यात घेतलं आहे.

अभिनेत्री श्रद्धा कपूर, दीपिका पदुकोण, नम्रता शिरोडकर आणि सारा अली खान यांचीही नावे अं.मली पदार्थ प्रकरणी समोर आली आहेत. शनिवारी एनसीबीनं सारा अली खान, श्रद्धा कपूर आणि दीपिका पादुकोन यांना चौकशीसाठी एनसीबी कार्यालयात बोलावलं होतं.

तसेच अभिनेता शाहरुख खान, अर्जुन रामपाल, रणबीर कपूर आणि डिनो मोरिया या बड्या कलाकारांचीही नावे अं.मली पदार्थ प्रकरणी समोर आली आहेत. अं.मली पदार्थ प्रकरणी या बड्या कलाकारांची नावे समोर आल्यानं इंडस्ट्रीमध्ये एकच खळबळ उडाली आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

धक्कादायक! मुंबईत आणखी एका अभिनेत्याची गळफा.स घेऊन आत्मह.त्या

अनुराग कश्यपला अट.क होणार? तब्बल 8 तास चौकशी करत पोलिसांनी अनुरागला…

सुशांत केसमध्ये खरंच अरबाज खानला अटक केलंय का?, जाणून घ्या काय आहे सत्य

ड्र.ग्ज काय आहे?, अभिषेक बच्चनच्या उत्तराने चाहते झाले हैराण

“सुशांतच्या मृ.त्युच्या आदल्या दिवशी रिया सुशांतला भेटली होती!”