सुशांतप्रकरणी रियाचा भाऊ शौविक सोबतच सॅम्युअल मिरांडाही गजाआड, रिया चक्रवर्तीच्याही अटकेची शक्यता

मुंबई | अभिनेता सुशांत सिंह राजपूत प्रकरणात अं.मली पदार्थांचा संबंध आढळल्यानं ना.र्कोटिक्स कंट्रोल ब्युरो याप्रकरणी तपास करत आहे. एनसीबीनं याप्रकरणी ड्र.ग्ज सप्लाय करणाऱ्या अनेकांना आत्तापर्यंत गजाआड टाकलं आहे. अशातच आता एनसीबीनं आणखी दोघांवर कारवाई करत अटक केली आहे.

सुशांतची एक्स गर्लफ्रेंड रिया चक्रवर्ती तसेच रियाचा भाऊ शौविक यांच्या मोबाईलमध्ये सीबीआयला ड्र.ग्जविषयीचं काही चॅट आढळलं होतं. यामुळे एनसीबीच्या एका टीमनं काल सकाळी रियाच्या घरावर छापा टाकला. तसेच एनसीबीच्या दुसऱ्या टीमनं रियाच्या कुटुंबाचा मॅनेजर सॅम्युअल मिरांडाच्या घरावर छापा टाकत सॅम्युअलला चौकशीसाठी ताब्यात घेतलं होतं.

एनसीबीच्या टीमनं एकसाथ दोन ठिकाणी सर्च ऑपरेशन चालू ठेवलं होतं. तपासादरम्यान एनसीबीला शौविक आणि सॅम्युअल विरोधी पुरावे मिळाल्यानं काल दोघांना अट.क केलं आहे. आज दुपारी एक वाजताच्या दरम्यान सॅम्युअल आणि शौविकला न्यायालयासमोर हजर केलं जाणार आहे. एनसीबी सॅम्युअल आणि शौविकच्या चौकशीसाठी न्यायालयाला कोठडीची मागणी करणार आहे. तसेच या दोघांसोबतच रियालाही अट.क केलं जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

एनसीबीनं शौविक चक्रवर्ती आणि सॅम्युअल मिरांडा या दोघांविरोधी एनडीपीएस कायद्यांतर्गत कलम 8 क, 20 ब, 27 अ, 28 आणि 29 अंतर्गत गु.न्हा दाखल केला आहे. या कलमा अंतर्गत दोषी ठरवलं गेल्यास दहा वर्षांच्या शिक्षेची तरतूद आहे. याप्रकरणी एनसीबीच्या जाळ्यात बॉलीवूड इंडस्ट्रीमधील आणखीही काही दिग्गज लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

शौविक आणि सॅम्युअलच्या अगोदर याप्रकरणी एनसीबीनं ड्र.ग पुरवठा करणाऱ्या कैजान, बासित परिहार आणि जैद या तिघांना अटक केली होती. रियाच्या घरातून एनसीबीनं काही इलेक्ट्रिक गॅजेट जप्त केले आहेत. या गॅजेटची तज्ञांच्या मदतीनं सध्या तपासणी चालू आहे.

दरम्यान, सुशांत सिंह राजपूत प्रकरणी सीबीआय सुशांतच्या मृ.त्यूचा शोध लावत आहे. सुशांतच्या पैशाचा गैरवापर झाला का याचा तपास ईडी घेत आहे. तसेच सुशांतप्रकरणी अं.मली पदार्थांच सेवन आणि व्यापार या गु.न्ह्यातील आरोपींचा तपास एनसीबी करत आहे. सीबीआय, ईडी तसेच एनसीबी अशा तीन एजन्सी सध्या सुशांतप्रकरणी तपास करत आहेत.

महत्त्वाच्या बातम्या-

ऐकावं ते नवलंच! 9 तास झोपा आणि लाखो रुपये कमवा; भारतीय कंपनी देतेय आगळीवेगळी संधी

सुशांत प्रकरणाचं गूढ उकलणार; मानसोपचार तज्ज्ञांनी केला सर्वात मोठा खुलासा!

रिया चक्रवर्ती आणि तिच्या भावामधील धक्कादायक चॅटिंग आलं समोर, पाहा काय आहे चॅट

सुशांतप्रकरणी मोठी बातमी! रियाच्या घरी छापा टाकत ‘या’ व्यक्तीला एनसीबीनं घेतलं ताब्यात

एकट्याने गाडी किंवा सायकल चालवताना मास्क घालणे बंधनकारक आहे का?

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More

Privacy & Cookies Policy