Top news मनोरंजन महाराष्ट्र मुंबई

सुशांत प्रकरणी रियाचा धक्कादायक खुलासा! ‘या’ व्यक्तीनं सुशांतला गां.जाची सवय लावली होती

मुंबई | अभिनेता सुशांत सिंह राजपूत प्रकरणात रोज नवनविन गोष्टी समोर येत आहेत. सुशांतची एक्स गर्लफ्रेंड रिया चक्रवर्तीच्या मोबाईलमध्ये अं.मली पदार्थांविषयीचं चॅट आढळल्यानं ना.र्कोटिक्स कंट्रोल ब्युरो याप्रकरणी तपास करत आहे. अं.मली पदार्थ संबंधात एनसीबीनं सलग तीन दिवस रियाची चौकशी केल्यानंतर रियाला अ.टक केली आहे. रियानं चौकशी दरम्यान अनेक महत्वाचे खुलासे केले आहेत.

सुशांत सिंह राजपूत ड्र.ग्जचं सेवन करत होता आपला ड्र.ग्जशी काहीही संबंध नाही, असं रिया चौकशी दरम्यान वारंवार सांगत होती. मात्र, एनसीबीकडं रिया विरुद्ध ठोस पुरावे होते. त्यामुळे एनसीबीनं रियावरील चौकशीचा फास आणखी आवळला होता. रियाच्या चौकशीच्या शेवटच्या दिवशी अखेर रियानं एनसीबीला आपणही ड्र.ग्जचं सेवन आणि व्यापार केल्याची कबुली दिली होती. रियानं चौकशी दरम्यान सुशांतला ड्र.ग्जची सवय कशी लागली याचाही खुलासा केला आहे.

बॉलिवूड मधील एका टॉपच्या फिल्ममेकरनं सुशांतला गां.जाचं सेवन करण्याची सवय लावली होती, असं रियानं चौकशी दरम्यान सांगितलं आहे. हा फिल्ममेकर सुशांतला पार्ट्यांमध्ये घेवून जात होता. त्या पार्ट्यांमध्ये गां.जा, एल.एसडी आणि को.केनचं सेवन व्हायचं. अशी माहिती सुशांतनंच रियाला दिली असल्याचं रियानं सांगितलं आहे.

तसेच सुशांत बरोबर लोणावळ्यातील पार्ट्यांना मी केव्हाही गेले नाही. या पार्ट्यांमध्ये येणाऱ्या लोकांना ड्रग्ज दिले जात होते. या पार्ट्यांमध्ये बॉलिवूड इंडस्ट्री मधील अनेक लोक उपस्थित असायचे, असंही रियानं चौकशी दरम्यान सांगितलं आहे.

रियानं अं.मली पदार्थ प्रकरणी बॉलिवूड मधील 25 ‘ए’ लिस्टर्स व्यक्तींची नावे घेतली आहेत. यामध्ये सारा अली खान आणि रकुल प्रीतसह अनेक दिग्गज लोकांची नावं रियानं घेतली आहेत. बॉलिवूड मधील ही 25 नावे अतिशय उच्च दर्जाची असल्यानं एनसीबी याप्रकरणी अतिशय काळजीपूर्वक तपास करत आहे.

दरम्यान, एनसीबीनं रिया चक्रवर्ती आणि सुशांत राजपूत यांना ड्र.ग्ज पुरवणाऱ्या करमजीत नावाच्या व्यक्तीला अ.टक केलं आहे. ड्र.ग्ज विश्वात करमजीत ‘केजे’ या नावानं प्रसिद्ध होता. करमजित बॉलिवूड विश्वातील अनेक लोकांना ड्र.ग्ज सप्लाय करत असल्याचं बोललं जात आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

दुचाकीला धडक देत तब्बल 4 वेळा कार हवेत उडाली अन् मग…; पाहा घटनेचा लाईव्ह व्हिडीओ

“दिल्लीत एका युवकानं पवारांना हाणलं होतं, जितेंद्र आव्हाड हे विसरलेले दिसत आहेत”

‘हे कायद्याचं राज्य आहे की एका बबड्याच्या फायद्याचं?’; ‘या’ भाजप नेत्याचा शिवसेनेला टोला

सुशांत प्रकरणी मोठी बातमी! सुशांत आणि रियाला गां.जा पुरवणारी ‘ही’ व्यक्ती गजाआड

भाऊ शौविककडून ‘ही’ चूक झाली अन् रिया एनसीबीच्या जाळ्यात अडकली