पिकअपचा चक्काचूर!, असा अपघात की हलक्या काळजाच्या लोकांनी वाचू नये

नागपूर | भारतात अपघाताचं (Road Accident) प्रमाण दिवसेंदिवस वाढतच असल्याचं दिसत आहेत. दररोज भारतात 1214 रस्ते अपघात होतात. रस्ते अपघातातील एकूण मृत्यूंपैकी 25 टक्के दुचाकी वाहने आहेत. (A pickup truck crashed in Nagpur)

देशात दररोज 14 वर्षांखालील 20 मुलांचा रस्ते अपघातांमुळे मृत्यू होतो. तर दररोज 377 लोकांचा मृत्यू होतो. केंद्र सरकारच्या अहवालातून ही माहिती समोर आली आहे.

अशातच आता नागपूरमध्ये पिकअपचा भीषण अपघात घडला आहे. बोलेरो पिकअप व्हॅनच्या अपघातात चार महिला मजुरांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.

या अपघातात 5 महिला जखमी झाल्याची देखील माहिती मिळाली आहे. नागपूर जिल्ह्यातील काटोल तालुक्यात हा अपघात झाला होता. पहाटेच्या सुमारास हा अपघात झाला.

ईसापुर-घुबडमेट परिसरात असलेल्या बगिच्यात या महिला संत्री तोडण्यासाठी जात असत. मात्र आज काळाने घात केला आणि त्यांच्या गाडीचा अपघात झाला.

पहाटेचे 4 वाजले होते. त्यावेळी बुलेरो गाडी चालवणाऱ्या चालकाचं नियंत्रण सुटलं आणि रस्त्याच्या कडेला असलेल्या एका झाडाला घडकली. या अपघातात तीन महिलांचा जागीच मृत्यू झाला.

एक महिला गंभीर जखमी झाली होती. तिला रूग्णालयात नेण्यात येत होतं. मात्र अखेर त्या महिलेने रूग्णालयात जातानाच जीव सोडला.

दरम्यान, सध्या पोलीस या घटनेबद्दल आणखी माहिती शोधत आहेत. तर पाच महिलांना रूग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

महत्वाच्या बातम्या-

‘नारायण राणेंनी इतरांची उणीदुणी काढण्यापेक्षा…’; अजित पवारांनी राणेंना दिला सल्ला

नवरीच कोरोना पॉझिटिव्ह!; ठाकरेंच्या नव्या सूनबाईंनी दिली माहिती

कोरोनापासून वाचण्यासाठी काय खावं, काय खाऊ नये?, वाचा अत्यंत महत्त्वाची माहिती

Omicron पासून वाचण्यासाठी असा करा स्वत:चा बचाव; तज्ज्ञांनी दिला मोलाचा सल्ला 

पुढील 24 तास महत्त्वाचे; राज्यातील काही भागात पावसाची शक्यता