मुंबई | केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी मोठा दावा केला आहे. राज्यातील सत्ताधारी महाविकास आघाडीचं सरकार ‘दोन ते तीन दिवस’ टिकेल, असं केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी म्हणाले आहेत. ते जालन्यात एका उद्घाटन समारंभात बोलत होते. यावेळी त्यांनी विविध विषयांवर भाष्य केलं आहे.
हे सरकार दोन ते तीन दिवस टिकेल. या बंडखोरीशी भाजपचा काहीही संबंध नाही. राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसने विकास निधी वळवल्याने शिवसेनेचे बंडखोर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर नाराज आहेत, असं दानवेंनी सांगितलं आहे.
मविआने उरलेली विकासकामे लवकरात लवकर पूर्ण करावीत, कारण आम्ही दोन ते तीन दिवसच विरोधी पक्षात आहोत. सरकारची वेळ संपत असल्याचं रावदाहेब दानवे म्हणाले आहेत.
कनाथ शिंदे त्यांच्या गटातील आमदारांची बैठक घेत आहेत. या बैठकीत एकनाथ शिंदे यांनी सर्व आमदारांना त्यांच्या कुटुंबीयांना केंद्रीय सुरक्षा देण्यात येईल, असे आश्वासन दिले आहे.
सरकार स्थापनेचा दावा करण्यासाठी येत्या दोन दिवसांत मुंबईत सुरक्षितपणे कसे पोहोचता येईल यावरही चर्चा झाल्याचं कळतंय.
महत्त्वाच्या बातम्या-
संजय राऊतांचा सर्वात मोठा गौप्यस्फोट, राजकीय वर्तुळात खळबळ
आणखी एक मंत्री नॉट रिचेबल; शिवसेनेचं टेंशन वाढलं
शिवसेनेला पुन्हा मोठा धक्का; ‘या’ बड्या नेत्याने दिला राजीनामा
सर्वात मोठी बातमी! राज्यात राष्ट्रपती राजवट लागणार?; अत्यंत महत्त्वाची माहिती समोर
‘…पण त्यांनी आता शिवसेनेच्या आईवरच हात घातला’, किशोरी पेडणेकरांचा घणाघात