रोहिणी खडसे यांच्या गाडीवर हल्ला, अज्ञात व्यक्तींकडून दगडफेक

जळगाव | राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्या कन्या आणि जिल्हा सहकारी बँकेच्या माजी अध्यक्षा रोहिणी खडसे यांच्यावर प्राणघातक हल्ला झाला आहे.

रोहिणी खडसे यांच्या कारवर अज्ञान व्यक्तींनी हल्ला केल्याची माहिती समोर आली आहे. मुक्ताईनगर मधील चांगदेव भागात ही घटना घडली आहे.

रात्री साडेनऊच्या सुमारास ही घटना घडली आहे. त्यामुळे आता परिसरातील वातावरण चांगलंच तापल्याचं पहायला मिळतंय.

गेल्या दोन दिवसात शिवसेना आमदार चंद्रकांत पाटील आणि रोहिणी खडसे यांच्यात कलगीतुरा रंगला होता. त्यामुळे राजकीय डावपेचातून हा हल्ला झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

या हल्ल्यामध्ये रोहिणी खडसेंना कोणतीही दुखापत झाली नाही, त्या सुरक्षित असल्याची माहिती मिळाली आहे. हल्ल्यानंतर काही वेळात पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते.

पोलीस सध्या हल्लेखोरांचा शोध घेत आहेत. असं असलं तरी आता राजकीय वर्तुळातून या घटनेचा निषेध व्यक्त होताना दिसत आहे.

राष्ट्रवादीच्या नेत्या आणि राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी कारवाईची मागणी केली आहे.

रोहिणी खडसे यांच्या गाडीवर थोड्या वेळापुर्वी प्राणघातक हल्ला हल्लेखोरांनी करण्यात आला आहे. एक महिला सक्षमपणे मतदारसंघात काम करीत असताना असे भ्याड हल्ले करणारे निर्दोष सुटता कामा नये, असं रुपाली चाकणकर म्हणाल्या आहेत.

हल्ला करणारे ते कोणीही असो, त्यांना सोडू नका. जळगाव पोलिस अधीक्षकांनी तातडीने हल्लेखोरांचा तपास करुन कडक कारवाई करावी, अशी मागणी देखील रूपाली चाकणकर यांनी केली आहे.

महत्त्वाच्या बातम्या- 

“आगामी काळात भाजप स्वबळावर लढणार, कुणीही यावं अन्…”

लहान मुलांचंही लसीकरण होणार, अशी करा तुमच्या मुलांची नोंदणी

राज्यात राष्ट्रपती राजवट लागणार?, शरद पवार म्हणाले…

विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक रेंगाळण्याची चिन्हे; राज्यपालांची हरकत

‘नितेश राणेंनी चुकच केली’; देवेंद्र फडणवीसांनी पुन्हा झापलं