मुंबई | केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांच्या कार्यक्रमामध्ये राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी गोँधळ घातला होता. देशात वाढणाऱ्या महागाई आणि बेरोजगारीविरोधात कार्यकर्त्यांनी हे आंदोलन छेडलं होतं. स्मृती इराणी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या जीवनावर आधारित एका पुस्तकाचे प्रकाशन करण्यासाठी पुण्यात आल्या होत्या. त्यावेळी मोठा गोंधळ झाल्याचं पाहायला मिळालं.
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना मारहाण झाल्याने भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना टॅग करत खोचक टोला लगावला होता.
भाजपने राजकारणाचा स्तर आधीच घालवलेला आहे. किमान महाराष्ट्राची संस्कृती घालवू नये. मारहाण प्रकरणाची सखोल चौकशी होऊन दोषींवर कठोर कारवाई व्हावी, अशी मागणी रोहित पवारांनी केली होती.
चंद्रकांत दादा पाटील आणि देवेंद्र फडणवीस आपण मोठे नेते आहात. किमान आपण तरी आपल्या कार्यकर्त्यांना समज द्याल आणि आवराल, अशी अपेक्षा असल्याचं रोहित पवारांनी म्हटलं होतं.
तसेच आपणच अशा प्रवृत्तीला पाठबळ देण्याचा प्रयत्न करत असाल तर हे दुर्देवी आणि महाराष्ट्राच्या संस्कृतीस कधीही न शोभणारे आहे, असंही रोहित पवार म्हणाले होते.
रोहित पवारांच्या टिकेवरून चंद्रकांत पाटलांनी प्रत्युत्तर दिलं आहे. रोहित बाबा एका केंद्रीय महिला मंत्र्यांच्या कार्यक्रमामध्ये घुसून गोंधळ, अंडी फेकणं कोणत्या संस्कृतीमध्ये बसतं?, असा प्रश्न चंद्रकांत पाटलांनी केला.
वयाने आणि अनुभवाने आमच्यापेक्षा ज्येष्ठ असलेल्या शरद पवारांनीच ही संस्कृती राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये रूजवली की?, त्यामागे दुसराच हात आहे?, असा सवाल चंद्रकांत पाटलांनी केला.
दरम्यान, गॅस सिलिंडर 350 रुपयांना मिळत असताना रस्त्यावर उतरून महागाई विरोधात आंदोलन करणाऱ्या स्मृती ताईंच्या स्मृती जागृत करण्यासाठी निवेदन देण्याचा प्रयत्न करणाऱ्या महिला कार्यकर्त्यांना भाजपच्या पुरुष कार्यकर्त्यांकडून झालेली मारहाण अत्यंत निंदनीय आहे, असं रोहित पवार म्हणाले होते.
रोहित बाबा, एका केंद्रीय महिला मंत्र्यांच्या पक्षकार्यक्रमात घुसून गोंधळ, अंडी फेकणं वगैरे वगैरे कुठल्या संस्कृतीत बसतं जरा सांगाल? वयानं आणि अनुभवानं आमच्यापेक्षा ज्येष्ठ नेते असलेल्या @PawarSpeaks यांनीच ही संस्कृती NCP कार्यकर्त्यांमध्ये रुजवली की, त्यामागे दुसराच ‘हात’ आहे? https://t.co/sHVpYezUDh
— Chandrakant Patil (@ChDadaPatil) May 17, 2022
महत्त्वाच्या बातम्या-
मोठी बातमी! मोदी सरकारच्या ‘या’ एका निर्णयानं आंतरराष्ट्रीय बाजारात खळबळ
शिवसेनेला मोठा झटका; उद्धव ठाकरेंनी संघावर टीका केल्याने ‘या’ नेत्याने दिला राजीनामा
“…तर तुमच्या दिल्लीच्या बापालाही माफी मागायला लावू”
“स्वत:च्या बायकोला लोक बोलली तर इतरांना पुढं करता का?”
“कारवाई न झाल्यास जशास तसं उत्तर देऊ”; देवेंद्र फडणवीस आक्रमक