रोहित शर्माच्या मॅचविनिंग खेळीला दिग्गज क्रिकेटपटूंचा सॅल्यूट!

मुंबई |  अतिशय अटीतटीच्या झालेल्या सामन्यामध्ये भारताचा तडाखेबाज फलंदाज रोहित शर्माने न्यूझीलंडच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला आणि भारताला सनसनाटी विजय मिळवून दिला. 2 चेंडूंवर 10 धावा हव्या असताना त्याने 2 उत्तुंग षटकार खेचत भारताला ऐतिहासिक विजय मिळवून दिला. त्यानंतर त्याच्या मॅचविनिंग खेळीला अनेक दिग्गज खेळाडूंनी सॅल्यूट ठोकलाय.

भारताचा माजी अष्टपैलू खेळाडू सिक्सरकिंग युवराज सिंग याने ट्वीट करत रोहित शर्माचं अभिनंदन केलंय तसंच कौतुक देखील केलं आहे. तू खरंच भारी खेळलास आणि खेळतोस असं ट्वीट युवराजने केलं आहे. रोहितचे लागोपाठ 2 षटकार…. काय सामना झाला…. असं ट्वीट भारताचा यष्टीरक्षक फलंदाज वृद्धीमान साहाने केलं आहे.

दोन चेंडूंमध्ये 10 धावा असताना रोहितने काय सुपर बँटींग केली, असं ट्वीट करत रोहितच्या बँटींगचं युसूफने कौतुक केलंय. तर इरफान पठाणने शमीच्या गोलंदाजीचं कौतुक केलं आहे. रोहितची फायर… बुमराहसाठी आजचा खराब दिवस, केन विल्यमसनचा मास्टरक्लास, असं ट्वीट कैफने केलं आहे.

दरम्यान,  सुपर ओव्हरपर्यंत रंगलेल्या सामन्यात भारताच्या रोहित शर्माने शेवटच्या दोन चेंडूंवर सलग 2 षटकार ठोकून भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं. तर मॅच टाय करण्यामध्ये मोहम्मद शमीने मोलाची भूमिका बजावली.

 

 

 

 

 

महत्त्वाच्या बातम्या-

-जन्मठेपेच्या शिक्षेला आव्हान देत अरूण गवळीची सर्वोच्च न्यायालयात धडक

-पुरोगामी चळवळीचा आधारवड हरपला; ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या विद्या बाळ काळाच्या पडद्याआड

-आमच्या नेत्यांचा अनादर केला तर चोख प्रत्युत्तर दिलं जाईल; चव्हानांनी घेतला आव्हाडांचा समाचार

-इंदिरा गांधींबाबतच्या ‘त्या’ वक्तव्यावर जितेंद्र आव्हाड म्हणतात…