मुंबई | केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या कामाचं कौतूक सध्या जगभरातील लोक करताना दिसतात. देशाच्या कानाकोपऱ्यात सध्या काम चालू आहे.
राज्यातील सर्वपक्षीय नेत्यांमध्ये चतूरस्त्र बैठक असणारा नेता म्हणून गडकरींना ओळखलं जातं. अशात आता राज्याचे माजी गृहमंत्री दिवंगत नेते आर.आर.पाटील यांचा मुलगा आणि राष्ट्रवादीचे युवा नेते रोहित पाटील यांची गडकरींनी भेट घेतली.
तासगाव भागातील महत्त्वाच्या रस्त्याचं काम घेऊन रोहित पाटील हे गडकरी यांच्याकडं गेले होते. त्यावेळी गडकरींनी रोहित पाटील यांंचं कौतूक केलं आहे.
गडकरींनी रोहित पाटील यांचं कामाबाबत म्हणणं ऐकून घेतलं. रोहित तू बिंधास्त जा तुझं काम झालं असं समज, असं देखील गडकरी म्हणाले आहेत.
दिल्लीत महाराष्ट्र असणं गरजेचं आहे, असं भावनिक वक्तव्य रोहित पाटील यांनी गडकरींच्या भेटीनंतर केलं आहे. परिणामी सध्या गडकरींच्या भेटीची चर्चा आहे.
तासगाव बाह्यरस्ता हा प्रस्तावित असून काही काम अपुर्ण राहिले आहे. या रस्त्यामुळं अनेक कारणांनी या भागाचा विकास होणार आहे, असंही रोहीत पाटील म्हणाले आहेत.
दरम्यान, नितीन गडकरी यांच्याकडे कोणतही काम घेऊन गेलं तर ते होतं हा राज्यातील नेत्याचा अनुभव असल्याचं अनेकांनी सांगितलं आहे. त्यात आता रोहित पाटील यांच्या वक्तव्याची भर पडली आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
ईडीच्या कारवाईनंतर संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…
“पैसे जपून खर्च करा, चिकन खरेदी करायला गेलात तरी भाजप ईडीला कळवेल”
लोकल प्रवाशांसाठी महत्त्वाची माहिती आली समोर, रेल्वेनं घेतला मोठा निर्णय
राज्यातील ‘या’ जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा, वाचा हवामान खात्याचा अंदाज