“फडणवीसांनी दिवाळीनंतर बॉम्ब फोडण्यापेक्षा दिल्लीत जाऊन लोकांसाठी तोंड उघडावं”

मुंबई | राज्यात सर्व ड्रग्जचा खेळ हा देवेंद्र फडणवीसांच्या इशाऱ्यावर सुरु आहे. ड्रग्जच्या खेळाचा मास्टर माईंड राज्याचे माजी मुख्यमंत्री तर नाही हा प्रश्न आमच्या डोक्यात येत आहे, असा गंभीर आरोप राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी केला होता.

नवाब मलिक यांनी केलेल्या आरोपावर विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्युत्तर देत नवाब मलिक यांच्यावर सडकून टीका केली.

मलिक यांनी ट्विट केलेल्या फोटोतील व्यक्तीशी आमचा कोणताही संबंध नाही, असं देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं.

नवाब मलिकांनी लवंगी फटाका फोडला आहे. दिवाळीपर्यंत थांबा, दिवाळीनंतर मी बॉम्बच फोडणार आहे, असा इशारा देवेंद्र फडणवीस यांनी दिला होता.

ज्यांचे संबंध अंडरवर्ल्डशी आहेत. त्यांनी माझ्याशी बोलू नये. मलिकांचे अंडरवर्ल्डशी संबंध कसे आहेत याचे पुरावे मी तुम्हाला देणारच आहे. पण शरद पवारांनाही हे पुरावे देणार आहे, असंही फडणवीस म्हणाले. याला राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

फडणवीस यांनी दिवाळीनंतर बॉम्ब फोडण्याऐवजी दिल्लीत जाऊन लोकांसाठी तोंड उघडावं, असा टोला रोहित पवारांनी देवेंद्र फडणवीसांना लगावला आहे.

लोकांची कामं तरी होतील. पवार कुटुंब ईडी, सीबीआय अशा कारवायांना बधणार नाही. शरद पवारांविरोधात कुणीतरी ट्रकभर पुरावे घेऊन येणार होतं, त्याचं काय झालं?, असा सवालही रोहित पवारांनी फडणवीसांना विचारला आहे.

शरद पवार हे योद्धे आहेत आणि त्यांच्यामागे जनतेची ताकद आहे, असं म्हणत रोहित पवारांनी देवेंद्र फडणवीसांवर निशाणा साधला आहे.

राज्यात महाविकास आघाडी सरकार चांगलं काम करत आहे. त्यामुळे विरोधकांचा पोटशूळ उठलाय, अशी टीका रोहित पवारांनी केली आहे.

पवार कुटुंबावर होत असलेल्या कारवायांकडे आम्ही लक्षही देत नाही, अशा शब्दात रोहित पवार यांनी फडणीसांच्या इशाऱ्याला प्रत्युत्तर दिलंय.

महत्त्वाच्या बातम्या-

“नवाब मलिकांनी खालचे कपडे काढले नाहीत तर बरं”

“रवी शास्त्री 24 तास नशेत असतात”; आरोपांनी भारतीय टीममध्ये मोठी खळबळ

मोदी सरकारकडून दिवाळी भेट! पेट्रोल आणि डिझेल ‘इतक्या’ रूपयांनी स्वस्त

”The Lalit’ में राज छुपे है’; नवाब मलिकांकडून भाजपला खास दिवाळी शुभेच्छा

“चला आव्हान स्वीकारलं, आता होऊन जाऊ दे दूध का दूध और पानी का पानी”