रोहित पवारांचा राम शिंदेंना धक्का; कर्जत नगरपंचायतीवर मिळवली एकहाती सत्ता

अहमदनगर | राज्यातील नगर पंचायतीचा पहिला निकाल राष्ट्रवादीच्या बाजूने लागला. त्यानंतर विजयाची घोडदौड कायम ठेवत राष्ट्रवादीने कर्जत नगरपंचायतीवर वर्चस्व निर्माण केलं आहे.

कर्जत नगरपंचायत निवडणुकीच्या (Karjat Nagar Panchayat Election) निकालात राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादीनं बाजी मारली आहे. राष्ट्रवादीनं 17 पैकी 12 जागा जिंकत एकहाती सत्ता काबिज केली आहे. राष्ट्रवादीनं 12, काँग्रेसनं 3 तर भाजपला केवळ दोन जागा जिंकता आल्या.

आज सकाळी मतमोजणीस सुरुवात झाली. सुरुवातीलाच कर्जत नगरपंचायतीचा निकाल लागला आहे. त्यात राष्ट्रवादीला 17 पैकी 12 जागा मिळाल्या असून भाजपला दोन जागांवर समाधान मानावं लागलं आहे.

कर्जत नगरपंचायतीवर भाजपची सत्ता येईल, असा विश्वास माजी मंत्री राम शिंदे यांनी व्यक्त केला आहे. यावेळी शिंदे यांनी रोहित पवारांवर जोरदार टीका केली आहे.

दबाव, दडपशाही, पैशाचा उतमात आणि सत्तेची मस्ती यापूर्वी कर्जदारांनी पाहिली नव्हती, असा हल्लाबोल त्यांनी केला आहे. राज्यात बहुतांशी नगरपंचायतीवर भाजपचा झेंडा फडकेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे.

दरम्यान, कर्जत नगरपंचायत निवडणुकीसाठी (Karjat Nagar Panchayat Election) काल पार पडलेल्या मतदान (Voting) प्रक्रियेत एकूण 80.21 टक्के मतदान (Voting) झाले होते. काल सायंकाळीच राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी (NCP Workers) फटाके फोडत विजयी जल्लोष साजरा केला होता.

कर्जतमध्ये राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार आणि भाजपचे राम शिंदे यांच्यात कांटे की टक्कर होती. मात्र, रोहित पवार यांनी राम शिंदेंना कात्रजचा घाट दाखवत कर्जत नगरपंचायतीवर वर्चस्व प्रस्थापित केल्याचं पाहायला मिळतंय.

महत्त्वाच्या बातम्या – 

वरूण धवनला मोठा धक्का; जवळच्या व्यक्तीचं हृदय विकाराच्या झटक्याने निधन 

दहावी, बारावी पास असणाऱ्यांसाठी नोकरीची सुवर्णसंधी; लवकर अर्ज करा 

“मारणं आणि जीवे मारणं यातला फरक कळतो का?”

कोरोना कधी संपणार?; WHO नं दिलेल्या उत्तरानं जगाचं टेंशन वाढवलं 

गर्भवती महिलांसाठी महत्वाची बातमी; कोरोना लस घेण्याबाबत तज्ज्ञांनी दिला ‘हा’ सल्ला