“वारंवार राज्यपालांकडे तक्रारी करण्यापेक्षा, जबाबदार विरोधी पक्ष नेता म्हणून मुख्यमंत्र्यांशी संवाद साधणं योग्य”

मुंबई |   विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी काल राज्यपाल भगसिंह कोश्यारी यांची भेट घेत कोरोनाची परिस्थिती हाताळताना राज्य सरकार करत असलेल्या चुका तसंच त्रुटी दाखवून देण्याचा प्रयत्न केला. त्यांनी यासंबंधी राज्यपालांना एक निवेदन दिलं. यावरच राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी आपलं मत व्यक्त केलं आहे.

फडणवीसजी, आरोप प्रत्यारोप सोडले तर आपण मांडलेले मुद्दे महत्त्वाचे असून त्यावर महाविकास आघाडी सरकार व मुख्यमंत्री साहेब काम करतच आहेत. पण राज्याच्या काळजीपोटी वारंवार राज्यपालांकडे तक्रारी करण्यापेक्षा जबाबदार विरोधी पक्ष नेता म्हणून मुख्यमंत्र्यांशी संवाद साधणं योग्य ठरू शकेल, असं मत रोहित पवार यांनी व्यक्त केलं.

शरद पवार यांनी पंतप्रधान मोदींना कोरोनाच्या परिस्थितीत दोन पत्र लिहून केंद्र सरकारला काही सूचना केल्या. यावरून देवेंद्र फडणवीस यांनी पवारांना टोला लगावत जसं मोदींना पत्र लिहिताय तसं एखादं पत्र उद्धव ठाकरेंना देखील लिहा, असं म्हटलं होतं. त्यांच्या या वक्तव्याला रोहित यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

शरद पवारांच्या दांडग्या अनुभवामुळे त्यांचं पत्र पंतप्रधान मोदीजींसाठी नेहमीच मार्गदर्शक ठरत असतं. त्यामुळे साहेबांच्या पत्राची चिंता न करता राज्यासाठी आपण काय करतो, याचं आत्मपरीक्षण केलं तर ते राज्यासाठी नक्कीच हितावह ठरेल, असं मला वाटतं, असं रोहित पवार म्हणाले.

 

 

महत्वाच्या बातम्या-

-चाणाक्ष महिला सरपंच… मुंबईतून आलेल्या 6 जणांना घरातच कोंडलं, 6 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह!

-राज्यासाठी नेमकं काय करतोय याचं जरा आत्मपरिक्षण करा; रोहित पवारांचा फडणवीसांना सल्ला

-लोकांमध्ये विश्वास निर्माण करा, मंत्री अधिकाऱ्यांना कामाला लावा; पवारांचा मुख्यमंत्र्यांना कानमंत्र

-‘खोटं बोलू नका’; काँग्रेसच्या त्या ट्विटवर अनुपम खेर संतापले

-लॉकडाउनचा नियम मोडला; ‘या’ भाजप आमदारावर दुसऱ्यांदा गुन्हा दाखल