पडळकरांची शरद पवारांवर जहरी टीका, नातू रोहित पवारांचं खास प्रत्युत्तर…

मुंबई |   शरद पवार हे महाराष्ट्राला झालेला कोरोना आहे, अशी जहरी टीका भाजपचे विधान परिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी केली. त्यानंतर राष्ट्रवादीतून अनेक नेत्यांनी त्यांना प्रत्युत्तर दिलं आहे. तसंच आज महाराष्ट्राच्या विविध शहरांमध्ये पडळकरांविरोधात आंदोलने सुरू आहेत. अशातच शरद पवारांचे नातू रोहित पवार यांनी यावर भाष्य केलं आहे.

गोपीचंद पडळकर ज्या पक्षातले आहेत त्या पक्षाचे महाराष्ट्रातील नेते देवेंद्र फडणवीस आहेत. वक्तव्य केल्यानंतर काही वेळानंतर त्यांच्याच नेत्यांनी त्यांना झापलं असं आम्हाला कळालं. गोपीचंद पडळकर यांनी त्यांच्या नेत्यांकडून शिकलं पाहिजे. त्यांच्या नेत्यांनी सांगितल्यावर आम्ही काय बोलणार, असं रोहित पवार म्हणाले.

पुढे बोलताना रोहित पवार म्हणाले काही लोक टीव्हीवर येण्यासाठी, बातम्या होण्यासाठी अशी वक्तव्य करत असतात. ओघाच्या नादात आपण काय बोलतोय हे विसरुन जातात. ओघाच्या नादात त्यांच्याकडून चूक झाली असं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं आहे

दुसरीकडे पडळकांच्या वक्तव्यानंतर भाजपने हात वर केले आहेत. पडळकरांनी पवारांवर बोलताना जरा विचार करून बोलायला हवं होतं. बोलण्याच्या नादात ते बोलून गेले असतील परंतू भाजप त्यांच्या विधानाचं समर्थन करत नाहीत, असं फडणवीस म्हणाले आहेत.

 

-एमपीएससी परिक्षेबाबत सुप्रिया सुळेंची ‘ही’ मागणी; लाखो विद्यार्थ्यांना होणार फायदा

-काय रे अक्षय, गाड्या वापरणं बंद केलंस की ट्विटर?, आव्हाडांचा चिमटा