‘त्यांनीच शिवसेनेत प्रवेश केला नाही म्हणजे झालं’; रोहित पवारांचा पाटलांना टोला!

मुंबई |   राज्याच्या हितासाठी आम्ही आजही शिवसेनेसोबत एकत्र यायला तयार असल्याचं भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं होतं. महाराष्ट्र भाजपची कार्यकारिणी बैठक पार पडल्यानंतर पाटलांनी असं प्रत्येकाला अचंबित करणारं वक्तव्य केलं होत. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रावादीचे आमदार रोहित पवार यांनी पाटलांना त्याचं नाव न घेता टोला लगावला आहे.

आजही शिवसेनेसोबत जाण्यास तयार असल्याचं भाजपातील एक मोठे नेते म्हणाले. सत्तेत येण्याची त्यांची घाई बघता 5 वर्षात भाजपपासून सोशल डिस्टन्स ठेवत अनेक इच्छुक असले, तरी किमान मला एकट्याला तरी महाविकास आघाडीत घ्या,असं म्हणून त्यांनीच शिवसेनेत प्रवेश केला नाही म्हणजे झालं! आतातरी राजकारण थांबवा!, असा टोला रोहित पवार यांनी लगावला आहे.

महाराष्ट्र भाजपची कार्यकारिणी बैठक पार पडल्यानंतर पाटलांनी हे वक्तव्य केलं होतं. त्यानंतर राजकीय चर्चांणा उधाण आलं होतं आणि अनेक नानाप्रकारच्या चर्चा रंगू लागल्या होत्या. मात्र फडणवीसांनी त्यावर स्पष्टीकरण देत चर्चांणा पुर्णविराम दिला होता.

दरम्यान, भाजपची मगरमिठी स्विकारली तरच राज्याचे हित या भ्रमात पाटलांनी राहू नये, असा टोला पाटलांना शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामनातून लगावण्यात आला होता.

 

महत्वाच्या बातम्या-

कौतुकास्पद! सोनूने भाजी विकणाऱ्या इंजिनियर मुलीला दिली नोकरी

“भारतानं सुरक्षेच्या दृष्टीनं 10 गोष्टी केल्या तर चीन 1 हजार गोष्टी करेल, राफेल ‘गेमचेंजर’ ठरणार नाही”

…अन्यथा आम्हाला झटका द्यावा लागेल; राज ठाकरे गरजले

दिलासादायक! पुण्यात जम्बो रुग्णालयं उभारण्याबाबत अजित पवारांनी केली मोठी घोषणा!

चंपा, टरबुज्या म्हटलं तर…; भाजप नेत्यांना ठेवण्यात आलेल्या टोपण नावाने चंद्रकांत पाटील भडकले!