Top news महाराष्ट्र मुंबई

निलेश राणेंच्या धमकीला मी घाबरत नाही- रोहित पवार

मुंबई |   गेले काही दिवस भाजपचे युवा नेते निलेश राणे आणि राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांच्यात ट्विटरवर वाकयुद्ध रंगलं आहे. ते वाकयुद्ध शमणार असं वाटत असतानाच आता निलेश राणेंच्या धमकीला मी घाबरत नाही, असं प्रत्युत्तर रोहित पवार यांनी दिलं आहे.

भरलेलं भांडं आणि मोकळं भांडं यामध्ये मोकळ्या भांड्याचा आवाज जास्त येतो. धमकीला मी अजिबात घाबरत नाही. शेवटी फक्त खोकल्या धमकीला कोण घाबरतो??, अस रोहित पवार म्हणाले. ते बीबीसी मराठीशी निलेश राणेंविषयी बोलत होते.

राष्ट्रवादीतल्या बऱ्याचश्या नेत्यांनी मला सांगितलं की अश्या लोकांच्या नादी लागून उगीच वेळ जातो. त्यापेक्षा त्यांच्या नादी लागयचं नाही. आपण आपलं काम करत राहायचं, असंही रोहित पवार यांनी सांगितलं.

तत्पूर्वी रोहित पवार यांना निलेश राणे यांनी शेंबड्या पोराची उपमा दिली होती. एवढ्यावरच निलेश राणे थांबले नाही तर त्यांनी चक्क रोहित पवार यांची लायकी काढली होती. यावर एखाद्याची पातळी फार खालची असते. त्या पातळीपर्यंत आपण जायचं नसतं, त्याकडे दुर्लक्ष करा, असा सल्ला राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आणि मंत्री जयंत पाटील यांनी रोहित यांना दिला होता.

राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांच्यावर निलेश यांनी टीका केली होती. त्यांच्यावरील टीकेला रोहित पवार यांनी निलेश यांना प्रत्युत्तर दिलं होते. तेव्हापासून निलेश राणे आणि रोहित पवार यांच्यात वाकयुद्ध रंगलं आहे. तसंच शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना साखर उद्योगासंदर्भात एक पत्र लिहिलं होतं. त्यावर निलेश राणे यांनी टीका होती. त्या ही वेळी रोहित यांनी निलेश राणे यांना प्रत्युत्तर दिलं होतं.

महत्वाच्या बातम्या-

-महाराष्ट्रातला मृत्यूदर गुजरात मध्य प्रदेशपेक्षा कमी, मात्र संसर्गाचा दर अधिक…

-आजारी वडिलांना घेऊन 7 दिवसांत 1200 किमी सायकल प्रवास; ज्योती कुमारचं इवांका ट्रम्पकडून कौतुक

-धोक्याची घंटा…. गेल्या 48 तासांत 288 पोलिसांना कोरोनाची बाधा

-‘भाजपच्या रणांगणातून’ ही प्रमुख आणि महत्त्वाची व्यक्ती गायब, राज्यभर चर्चांना उधाण

-संकटात सापडलेल्या राज्याला सावरायचं सोडून आंदोलन करून दुहीची बिजं पेरली; आव्हाडांची टीका