मुंबई | महाविकास आघाडी आणि भाजपमध्ये सध्या जोरदार वाद रंगला आहे. विविध मुद्द्यांवरून महाविकास आघाडीचे नेते भाजपला घेरण्याचा काम करत आहेत.
शिवसेना खासदार संजय राऊत यांनी ईडीच्या कारवाईवरून भाजपला घेरलं असताना आता राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी भाजपवर जहरी टीका केली आहे.
काही दिवसांपूर्वी राज्यासह देशात ड्रग्ज प्रकरण गाजलं होतं. त्यानंतर भाजपनं महाविकास आघाडीवर जोरदार टीका करण्याचा सपाटा चालवला होता. परत एकदा आता ड्रग्ज प्रकरणावरून राज्याचं राजकारण पेटण्याची शक्यता आहे.
राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपला राजभवनात सातत जाण्याच्या कारणावरून टोमणे मारले होते. आता रोहित पवारांनी देखील भाजपवर राजभवनाचा उल्लेख करत टीका केली आहे.
सप्टेंबर 2021-21 हजार कोटी, नोव्हेंबर 2021-500 कोटी, जानेवारी 2022-2 हजार कोटी, इतक्या मोठ्या प्रमाणात गुजरातमध्ये सापडलेलं ड्रग्स सापडलं होतं, असं रोहित पवार म्हणाले आहेत.
गुजरातमध्ये सापडलं त्याच्या 1 टक्के ड्रग्स जरी महाराष्ट्रात सापडलं असतं तर राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करा, या मागणीसाठी राज्यातल्या काही भाजप नेत्यांनी तर राजभवनावर मुक्कामच ठोकला असता, अशी टीका रोहित पवारांनी केली आहे.
रोहित पवारांच्या या टीकेनंतर राज्यातील राजकारण आता ड्रग्ज या विषयावर परत एकदा पेटण्याची शक्यता आहे. राज्यातील आर्यन खान प्रकरण हे देशातील गाजलेल्या ड्रग्ज प्रकरणांपैकी एक आहे.
दरम्यान, काही महिन्यांपूर्वी गुजरातच्या मुंद्रा बंदरावरून हजारो कोटींचं ड्रग्ज ताब्यात घेण्यात आलं होतं. या बंदराचा ताबा सध्या प्रसिद्ध उद्योगपती गौतम अदानी यांच्या समुहाकडं आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
“काँग्रेस बुडवण्यासाठी इतर कुणाचीही गरज नाही, राहुल-प्रियांकाच पुरेसे आहेत”
‘मी आतापर्यंत आक्रमक होतो पण…’; खासदार संभाजीराजेंनी केली ‘ही’ मोठी घोषणा
‘आय रिपीट, भाजपचे साडे तीन नेते…’; संजय राऊतांच्या नव्या दाव्याने खळबळ
डॉ. सुवर्णा वाजे प्रकरणी आणखी एक धक्कादायक खुलासा समोर
राकेश झुनझुनवालांना मोठा झटका; एका दिवसात झालं ‘इतक्या’ कोटींचं नुकसान