मुंबई : आमचं कुटुंब एवढं मजबूत आहे की आमचा नाद करणारेच एकदिवस बाद होऊन जातील, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे नातू आणि राष्ट्रवादीचे नेते रोहित पवार यांनी केली आहे. फेसबूक पोस्टद्वारे रोहित पवार यांनी सत्ताधारी पक्षांवर निशाणा साधला आहे.
गेल्या दोन दिवसातील राष्ट्रवादीत घडलेल्या राजकीय घडामोडीमुळे संपूर्ण राज्याच राजकारण ढवळून निघालं आहे. याच पार्श्वभूमीवर रोहित पवार यांनी फेसबुक पोस्टद्वारे आपल्या भावना मांडल्या आहेत.
माझ्या आजोबांच्या म्हणजेच पवार साहेबांच्या ठिकाणी तुम्ही स्वतःच्या आजोबांना ठेवा आणि माझ्या अजित काकांच्या ठिकाणी तुम्ही आपल्या काकांना गृहीत धरा, सूडाच्या भावनेच्या राजकारणातून विरोधी पक्षांकडून साहेबांना आणि दादांना जो त्रास दिला जातो तेवढा त्रास जर तुमच्या आजोबांना किंवा काकांना दिला गेला असता तर तुम्ही काय केलं असत?, असं रोहित पवारांनी म्हटलं आहे.
लक्षात ठेवा जिथं प्रामाणिक प्रेम असतं तिथंच एवढ्या प्रामाणिक भावना असतात. अजित दादांच्या आजच्या भावनाच आमच्या कुटुंबातील एकमेकांवर असलेलं प्रेम दाखवून देतात, असंही त्यांनी फेसबुक पोस्टमध्ये म्हटलं आहे.
मी मागे पण सांगितलं आहे की अजिबात कशाची काळजी करू नका, आपला गडी लै खंबीर हाय. समाजाप्रती जे आपलं कर्तव्य आहे ते पवार कुटुंबीय आजपर्यंत पार पाडत आलंच आहे आणि यापुढेही हे काम सुरूच राहील, असंही रोहित पवार म्हणाले.
महत्वाच्या बातम्या-
नागपुरात मुख्यमंत्र्यांच्या विरोधात ‘या’ नेत्याने थोपटले दंड!- https://t.co/vFND0SbYee #म
— महाराष्ट्र केसरी (@MahaKesariNews) September 29, 2019
“ईडी पिडा टाळण्यासाठी कमळाचं फूल जवळ ठेवा”- https://t.co/dxpad2LiYY @rautsanjay61 @BJP4Maharashtra
— महाराष्ट्र केसरी (@MahaKesariNews) September 29, 2019
राजकीय भांडवल करण्यापेक्षा कोर्टात जा; माधव भांडारींचा पवारांना सल्ला https://t.co/FsNbDWckiC @BJP4Maharashtra @AjitPawarSpeaks @PawarSpeaks
— महाराष्ट्र केसरी (@MahaKesariNews) September 28, 2019