रोहित पवार म्हणतात, न्यायव्यवस्थेवर माझा विश्वास आहे… विजय सत्याचाच!

सांगली | भाजपचे माजी मंत्री आणि नेते राम शिंदे यांनी रोहित पवारांनी विधानसभेला केलेल्या प्रचारावर आक्षेप घेत त्यांच्यावर याचिका दाखल केल्याने राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांच्या आमदारकीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. यावर रोहित पवारांनी आपली बाजू मांडली आहे.

मला कोर्टाची नोटीस आली आहे. इलेक्शन लढत असताना जसा लोकांवर माझा विश्वास होता. त्याच प्रकारे न्यायव्यवस्थेवरही माझा विश्वास आहे. मी कुठल्याही चुकीच्या पद्धतीने इलेक्शन लढलो नसल्याचं रोहित पवारांनी म्हटलं आहे.

माझा न्यायव्यवस्थेवर माझा विश्वास आहे. विजय हा सत्याचाच होईल. त्या ठिकाणी माझी बाजू योग्य असेल असं मला या ठिकाणी आपल्या सर्वांना सांगायचं असल्याचं यावेळी बोलताना पवार यांनी सांगितलं आहे.

दरम्यान, मतदानाच्या आदल्या दिवशी कोरेगाव या गावामध्ये आमदार रोहित पवार यांचे दोन प्रतिनिधी मतदारांना पैसे वाटत होते. मतदारांना पैसे वाटल्यामुळे निकालावर परिणाम झाला झाला. त्यामुळे रोहित पवारांची आमदारकी रद्द व्हावी अशी मागणी राम शिंदे यांनी केली आहे.

महत्वाच्या बातम्या- 

-‘तेरे दर पर सनम चले आये’; लालूंचा नितीश कुमारांना फिल्मी स्टाईल टोला

-…म्हणून राज्य निवडणूक आयोगाने बजावली राज ठाकरेंना नोटीस

-वडील चालवतात पंक्चरचं दुकान; अन् लेक झाला सलग दोन वेळा दिल्लीचा आमदार

-श्रद्धा आणि टायगर हटके अंदाजात प्रेक्षकांच्या भेटीला ; पाहा व्हिडीओ

-कमलनाथ, तमाम शिवभक्तांची माफी मागा- उदयनराजे भोसले