महाराष्ट्र मुंबई

नोकरभरती रद्द करू नका, वर्षभर किमान वेतनावर सेवेत घ्या- रोहित पवार

मुंबई | सरकारने नोकरभरती रद्द केल्याने अनेक युवा उमेदवार पुढच्या वर्षी वयाच्या निकषातून बाद होतील. त्यामुळे वर्षभर किमान वेतनावर सेवेत घेण्याची मागणी राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी राज्य सरकारला केली आहे.

कोरोनामुळे आलेल्या वित्तीय संकटामुळे सरकारने यंदा नोकरभरती रद्द केली, पण वयाच्या अटीमुळे अनेक युवा एज बार होतील. त्यामुळे सरकारने भरती रद्द न करता एक वर्षासाठी मोफत सेवा/किमान वेतन द्यावे. यामुळे युवांना नोकरी आणि सरकारला मनुष्यबळ मिळेल. याला युवा सहकार्य करतील, असा विश्वास रोहित पवारांनी व्यक्त केला आहे.

परराज्यातील या कामगारांअभावी उद्योग-व्यवसाय सुरू करण्यात अडचण येऊ शकते. पण हे कामगार परत गेल्याने निर्माण झालेल्या संधीचा फायदा मराठी मुलांनी उठवावा आणि आजच्या संकटात कोणतंही काम कमी दर्जाचं समजू नये, असा सल्लाही रोहित पवार यांनी तरुणांना दिला आहे.

दरम्यान, जोपर्यंत राज्याची आर्थिक परिस्थिती सुधारत नाही, तोपर्यंत आम्ही मोफत काम करण्यासाठी तयार आहोत. पण नोकरभरती करा, अशी मागणी मराठा क्रांची मोर्चाचे समन्वयक विनोद पाटील यांनी केली आहे.

 

महत्वाच्या बातम्या-

-‘…तर आर्मी बोलवावी लागेल’; किशोरी पेडणेकरांचा इशारा

-हायकोर्टाची महाराष्ट्र सरकारला मदत; मुख्यमंत्री सहाय्यता निधीत अडीच कोटी जमा

-“देश कोरोनाच्या संकटात असताना पेट्रोल डिझेलवरचं उत्पादन शुल्क वाढवणं चुकीचं”

-“नक्की नियंत्रणात काय, कोरोनाची स्थिती का आमदारकी?”

-“शाहू राजांनी तोफा वितळवून नांगर बनवले आणि महाराष्ट्राने फडणवीसांचा माज उतरवून भंगार बनवलं”