मला स्वत:च्या कष्टाच्या पैशातून हेलिकॉप्टर घ्यायचंय; रोहित पवारांचं रॉयल स्वप्न

मुंबई | राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांना स्वता:च्या कष्टाच्या पैशातून आता हेलिकॉप्टर घ्यायचं आहे, अशी माहिती खुद्द रोहित पवार यांनी औरंगाबादमध्ये एका दैनिकाला दिलेल्या मुलाखतीमध्ये बोलताना दिली आहे.

अनेकांना बाऊन्सर ठेवायला आवडतं. मला तसं काही पटत नाही. अनेक जण शहर मागे पडलं की गाड्या बदलतात. असं एकीकडे एक आणि दुसरीकडे दुसरं वागणं जमत नाही, असं रोहित पवारांनी सांगितलं आहे.

रोहित पवार हे अनेक प्रकारच्या कार आणि दुचाक्यांचे धनी आहेत. आवडेली गाडी ते खरेदी करतातच. मात्र आता त्यांना गाडी नाही तर हेलिकॉप्टर घ्यायचं असल्याचं रोहित पवारांनी एका मुलाखतीत म्हटलंय. यावेळी त्यांनी अनेक विषयांवर भाष्य केलं.

दरम्यान, लहानपणापासून शरद पवारसाहेबांना पाहात आलोय. ते राज्यातील कुठल्याही कोपऱ्यातून आलेल्या व्यक्तीला नावानिशी ओळखतात. त्यांची बुद्धिमत्ता प्रचंड आहे, असं रोहित पवारांनी सांगितलं आहे.

महत्वाच्या बातम्या- 

-…पण जर माझा फोन टॅप झाला असेल तर हे अत्यंत दुर्दैवी- एकनाथ खडसे

-‘भाजप नेत्यांचं मानसिक संतुलन बिघडलंय’; राष्ट्रवादीची बोचरी टीका

-…म्हणून दिली ठाकरे सरकारने वसंतदादा शुगर इंन्स्टिट्यूटला 51 हेक्टर जमीन

-उद्धव ठाकरेेंच्या मंत्रिमंडळातील ‘या’ दोन मंत्र्यांच्या जीवाला धोका; केली सुरक्षा वाढवण्याची मागणी

-केदार जाधव, मुक्ता बर्वे, धर्मकिर्ती सुमंत यांना पुणे विद्यापीठाचा ‘युवा गौरव पुरस्कार’