“होय, पवार साहेब खोटं बोलले याचा आम्हाला अभिमान आहे”

मुंबई | एकीकडे राज्यात भोंग्यांच्या प्रश्नावरून संघर्ष निर्माण झाला असताना देशात काही ठिकाणी दंगली घडल्यानं कायदा व सुव्यवस्थेची परस्थिती निर्माण झाली आहे.

देशात काही ठिकाणी झालेल्या दंगलीवरून राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी भाजपवर जोरदार टीका केली आहे. टीका करत असताना रोहित पवार यांनी शरद पवारांच्या कार्याचा उल्लेख केला आहे.

1993 सालच्या मुंबई दंगलीची चौकशी करणाऱ्या न्या. श्रीकृष्ण आयोगानं देखील शरद पवार यांच्या खोटं बोलण्याची विशेष दखल घेतल्याचं रोहित पवार म्हणाले आहेत.

धिस इज द एक्झापल ऑफ स्टेट्समनशिप या शब्दात श्रीकृष्ण आयोगानं कौतूक केलं होतं. म्हणून साहेबांच्या खोटं बोलण्याचा आम्हाला अभिमान आहे, असं ट्विट रोहित पवारांनी केलं आहे.

राज्यात दंगल भडकवण्याचा आएयसआयचा प्रयत्न पवार साहेबांनी उधळून लावला होता. म्हणूनच राज्यात शांतता प्रस्थापित झाली होती. पण आज दंगल भडकावून त्यात राजकीय पोळी भाजण्याचा तर प्रयत्न कुणाचा नाही ना?, असा सवाल रोहित पवारांनी उपस्थित केला आहे.

राष्ट्रपती असताना खुद्ध प्रणव मुखर्जी साहेबांनी शरद पवारांच्या कार्याचा उल्लेख केला होता. मुंबई वाचवण्याच्या त्यांच्या प्रयत्नाना मुखर्जी यांनी सलाम केला होता, असंही पवार म्हणाले आहेत.

शरद पवार आणि अजित पवार यांना लक्ष्य करणंं म्हणजे राज्याच्या राजकीय संस्कृतीला टार्गेट करण्यासारखं आहे, अंसही रोहित पवार म्हणाले आहेत.

दरम्यान, दिल्लीमध्ये दोन गटातील वादाला दंगलीचं स्वरूप आल्यानंतर मोठ्या प्रमाणात हिंसाचार उसळला होता. परिणामी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावर विरोधक टीका करत आहेत.

महत्त्वाच्या बातम्या – 

“तो येईल भाषण करून जाईल, तुम्ही इतकं महत्त्व देताच कशाला”

मलिकांच्या अडचणीत वाढ, न्यायालयाचा मोठा दणका

“जेम्स लेन 20 वर्षे कुठं गेला होता?, गाडलेला राक्षस बाहेर काढू नका”

“…तर हिंदूंनी जास्तीत जास्त मुलांना जन्म दिला पाहिजे” 

मोठी बातमी! लखीमपूर खेरी हिंसाचार प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वाचा निर्णय!