Rohit sharma Catch l वयाच्या 36 व्या वर्षी हिटमॅनची एवढी दमदार फिल्डिंग की पुन्हा पुन्हा पाहतच राहावा वाटते! पाहा व्हिडिओ

Rohit sharma Catch l भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत धावा करण्यासाठी सज्ज आहे. कारण गेल्या काही सामन्यातील त्याच्या खराब फॉर्ममुळे त्याच्यावर मोठ्या प्रमाणात टीका होत आहे. मात्र आज सुरु असलेल्या भारत विरुद्ध इंग्लंडच्या सामन्यांत कर्णधार रोहित शर्माने त्याच्या फिटनेसने सर्वांना प्रभावित केले आहे. विशाखापट्टणममध्ये खेळल्या जात असलेल्या मालिकेतील दुसऱ्या कसोटीच्या चौथ्या दिवशी त्याने स्लिपमध्ये असा कॅच घेतला आहे की तो पाहिल्यानंतर पुन्हा पुन्हा पाहावासा वाटत आहे.

Rohit sharma Catch l तीन दिवसांत भारतीय संघ प्रबळ :

भारत आणि इंग्लंड या दोन संघातील पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना विशाखापट्टणम येथे खेळवला जात आहे. सामन्याच्या तीन दिवसांत भारतीय संघ प्रबळ दिसला आणि चौथ्या दिवशीही पहिल्या सत्रातही तेच दिसून आले आहे. भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना यशस्वी जैस्वालच्या 209 धावांच्या जोरावर पहिल्या डावात 396 धावा केल्या आहेत. (Rohit sharma Catch)

जसप्रीत बुमराहच्या (jasprit bumrah) घातक गोलंदाजीच्या जोरावर टीम इंडिया अवघ्या 253 धावांत आटोपली आणि 143 धावांची महत्त्वपूर्ण आघाडी घेतली. भारताकडून दुसऱ्या डावात शुभमन गिलने शतक झळकावले. भारताला केवळ 255 धावा करता आल्या तरीही इंग्लंडसमोर 399 धावांचे मोठे लक्ष्य ठेवण्यात ते यशस्वी ठरले आहेत.

Rohit sharma Catch l रोहित शर्माने घेतला अप्रतिम झेल :

विशाखापट्टणम कसोटीच्या चौथ्या दिवशी भारतीय कर्णधाराने स्लिपमध्ये एक झेल घेतला ज्यासाठी त्याने फक्त 0.45 सेकंद घेतले आहेत. भारत विरुद्ध हैदराबाद कसोटीच्या दुसऱ्या डावात 196 धावा करून सामन्याचे कलाटणी देणारा ओली पोप या सामन्याच्या चौथ्या दिवशी आर अश्विनच्या चेंडूवर रोहित शर्माने झेलबाद केला आणि अवघ्या 23 धावांवर ओली पोप बाद झाला.

News Title : Rohit sharma Catch

महत्वाच्या बातम्या – 

Post Office Old Age Scheme l नातवंडांनो…तुमच्या ही आजी आजोबांचे पैसे या योजनेत गुंतवा आणि भरघोस परतावा मिळवा

Ganpat Gaikwad Firing l बापरे! या जिल्ह्यातील तब्बल 4 हजार जणांकडे बंदुकी

Amol Kolhe Viral Video l अमोल कोल्हेंचा राम मंदिराबाबतचा व्हिडीओ होतोय तुफान व्हायरल; पाहा व्हिडीओ

Politics Breaking News l राजकारणात मोठी खळबळ उडण्याची शक्यता! आश्चर्यचकित करणारा सर्वे समोर

Today Horoscope l आजचे राशिभविष्य! या राशी प्रेमप्रकरणात यशस्वी होतील