ठरलं तर! भारतीय कसोटी संघाच्या कर्णधारपदी ‘या’ दिग्गज खेळाडूची वर्णी

नवी दिल्ली | भारतीय क्रिकेट संघ सध्या वेस्ट इंडिजविरूद्ध टी ट्वेंटी मालिका खेळत आहे. भारत या मालिकेत 2-0 असा आघाडीवर आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली संघाचा आलेख उंचावताना पहायला मिळत आहे.

भारताचा माजी कर्णधार विराट कोहलीनं तिन्ही प्रकारच्या संघाचं कर्णधारपद सोडल्यानंतर रोहित शर्माला वनडे आणि ट्वेंटी संघाच्या कर्णधारपदी नेमण्यात आलं होतं.

भारताचा पुढचा कसोटी कर्णधार कोण होणार याकडं सर्वांचं लक्ष लागलं होतं. राष्ट्रीय निवड समितीनं भारताच्या कसोटी संघाचा पुर्णवेळ कर्णधार म्हणून रोहित शर्माची निवड केली आहे.

रोहित सलामीवीर म्हणून आपली जबाबदारी सक्षमपणे पार पाडत आहे. अशावेळी भारताचा पुर्णवेळ कसोटी संघाचा कर्णधार म्हणून बीसीसीआयनं त्याच्या नावाला पसंती दर्शवली आहे.

रोहितच्या अनुपस्थितीत दक्षिण आफ्रिका संघाविरूद्ध मालिकेत सध्याचा मर्यादित षटकांचा उपकर्णधार केएल राहुलला कसोटी कर्णधार करण्यात आलं होतं. परिणामी राहुल देखील कर्णधारपदाच्या शर्यतीत होता.

रोहितची पुर्णवेळ कसोटी कर्णधार म्हणून निवड झाल्यानंतर पहिलाच दौरा हा श्रीलंका संघाविरूद्ध आहे. श्रीलंका संघाविरोधात भारत दोन कसोटी सामन्यांची मालिका खेळणार आहे.

भारताचा नियोजित उपकर्णधार केएल राहुल श्रीलंकेविरूद्धच्या मालिकेत खेळणार नाही. तर भारताचा माजी कर्णधार विराट हा श्रीलंकेविरूद्धच्या टी ट्वेंटी मालिकेत खेळणार नाही.

भारतीय कसोटी संघाची घोषणा करताना निवड समितीनं अजिंक्य रहाणे आणि चेतेश्वर पुजारा यांना संघात स्थान दिलं नाही. परिणामी त्यांना आता रणजी स्पर्धेत चांगली कामगिरी करावी लागणार आहे.

दरम्यान, बीसीसीआयनं क्रिकेटच्या सर्व प्रकारासाठी एकच कर्णधार ठेवण्याची पद्धत चालू ठेवली आहे. रोहित हा आता भारतीय संघाचं सर्व प्रकारच्या क्रिकेटमध्ये नेतृत्व करणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या – 

‘कुणाची सुपारी घेऊन आलाय का?’; भर कार्यक्रमात प्रश्न विचारणाऱ्या तरूणावर अजित पवार भडकले 

काय सांगता! दारू आणि तंबाखू सेवनात महिला अव्वल, धक्कादायक आकडेवारी समोर 

 “सासू बनून त्रास द्याल तर सुनेचेही दिवस येतील”

छत्रपती शिवाजी महाराजांच्या सर्वात उंच पुतळ्याचं औरंगाबादेत आदित्य ठाकरेंच्या हस्ते अनावरण! 

“शेंबड्या मुलासारखं लढायचं आणि मैदानात हरायचं, सोमय्या असो किंवा फडणवीस…”