आफ्रिकेविरूद्धच्या कसोटी सामन्यात हिट मॅन केला हा ‘खास’ पराक्रम

विशाखापट्टणम : टीम इंडियाचा स्टार फलंदाज रोहित शर्माने कसोटीत पहिल्यांदाच सलामीला येत नवे विक्रम नावावर केले आहेत. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटीत पहिल्या डावातील 176 धावांच्या खेळीनंतर रोहित शर्माने दुसऱ्या डावातही शतक (127) ठोकलं. सुनील गावकर, राहुल द्रविड, विराट कोहली या दिग्गजांच्या रांगेत आता रोहितचाही समावेश झाला आहे.

सलामीवीर म्हणून रोहित शर्माचा हा पहिलाच कसोटी सामना आहे. या सामन्यातील पहिल्या डावात त्याने धडाकेबाज फलंदाजी करत 176 धावा रचल्या. त्यानंतर दुसऱ्या डावातही सलामीला येत शतकी खेळी करत भारताला मजबूत स्थितीत उभं केलं. दुसऱ्या डावात 127 धावा करुन रोहित बाद झाला.

रोहित शर्माने कसोटी क्रिकेटचं रुपांतर टी-20 क्रिकेटमध्ये केलं. या कसोटीत त्याने एकूण 13 षटकार ठोकले. एकाच कसोटीत सर्वाधिक षटकार मारणारा तो जगातला पहिला फलंदाज ठरला आहे. यापूर्वी 1996 मध्ये वसीम अक्रमने सर्वाधिक 12 षटकार ठोकले होते.

एका कसोटीत सर्वाधिक षटकार ठोकणाऱ्या यादीत रोहितने  सर्व भारतीयांना मागे टाकलंय. आतापर्यंत हा विक्रम नवज्योत सिंह सिद्धू यांच्या नावावर होता. त्यांनी 1994 ला लखनौच्या मैदानात श्रीलंकेविरुद्ध 9 षटकार ठोकले होते. त्यानंतर मॅथ्यू हेडन, विरेंद्र सेहवाग, हरभजन सिंह आणि अजिंक्य रहाणे यांच्या नावावरही अनुक्रमे 7 षटकार ठोकण्याचा विक्रम होता. 

रविचंद्रन अश्विनने कसोटीत कमबॅक करत संधीचं सोनं केलं. दक्षिण आफ्रिकेच्या पहिल्या डावात त्याने सात विकेट्स घेतल्या. याशिवाय रवींद्र जाडेजाने दोन आणि ईशांत शर्माने एका फलंदाजाला बाद केलं. मात्र भारताने 502 धावा करुनही मोठी आघाडी मिळवता आली नाही.  

महत्वाच्या बातम्या-