रोहित शर्माकडून रिषभ पंतचं नामकरण; ठेवलं हे विनोदी नाव…

मुंबई – भारताचा युवा क्रिकेटपटू रिषभ पंतनं गयानामध्ये वेस्ट इंडिज विरूद्ध झालेल्या तिसऱ्या आंतरराष्ट्रीय टी-२० सामन्यात ४२ चेंडूत ६५ धावांची खेळी केली. त्याच्या या खेळीची सध्या एकच चर्चा आहे. याविषयी बोलताना रोहित शर्मानं चक्क रिषभ पंतचं नामकरण करुन टाकलं.

सामन्यानंतर रोहित शर्मानं बीसीसीआय टीव्हीसाठी रिषभ पंतची मजेशीर मुलाखत घेतली. रोहितसोबतच्या मुलाखती दरम्यान रिषभ पंतनं निराशा, खेळ कोणत्या विचारांसोबत खेळणं आणि दबावात कसं प्रदर्शन करणं? यासारख्या गोष्टींवर चर्चा केली.

रोहितनं मुलाखतीची सुरूवात मस्करीच्या अंदाजात केली. यादरम्यान त्यानं रिषभ पंतचं नाव बदलून टाकलं. आपल्यासोबत आहे रिषभ संत, ओह! माफ करा रिषभ पंत, असं तो मुलाखतीच्या सुरुवातीलाच म्हणाला.

पाहा तो भन्नाट व्हीडिओ-

जेव्हा मोठी धावसंख्या बनत नाही तेव्हा तू निराश होत असशील ना?, असा सवाल रोहित शर्मानं रिषभ पंतला विचारला. यावर कधी-कधी निराशा होतो, मात्र खेळात सर्वात महत्त्वपूर्ण गोष्ट आहे, की मैदानावर चांगलं किंवा वाईट कोणताही काळ सुरू असो, तुम्हाला नेहमीच स्वतःच्या खेळाला पदोन्नती द्यावी लागते, असं तो म्हणाला.

जेव्हा कॅप्टन कोहलीसोबत मी फलंदाजी करत होता, तेव्हा आमची योजना एकदम सोपी होती. आम्हाला केवळ एवढंच माहित होतं की आम्हाला चांगली भागेदारी करायची आहे. शेवटच्या ७-८ षटकांमध्ये धावगतीला वाढवायची आहे. आम्ही आनंदी आहोत की असं करण्यात आम्ही यशस्वी ठरलो. कॅप्टन आणि टीम मॅनेजमेंटच्या सहकार्यानं बराच विश्वास वाढतो आणि चांगल्या कामगिरीसाठी प्रेरणा देखील मिळते. मी अतिरिक्त दबावापासून मुक्त झालो, कारण कॅप्टन आणि टीम मॅनेजमेंटनं माझ्यावर विश्वास दाखवला. मला मुक्तपणे खेळण्यास परवानगी दिली- रिषभ पंत

रिषभनं संधीचं सोनं केलं-

 वेस्ट इंडिजच्या दौऱ्यावर पहिल्या दोन सामन्यांमध्ये रिषभ पंतला सपशेल अपयश आलं होतं. दोन सामन्यांमध्ये त्याला केवळ चार धावा करता आल्या होत्या. तिसऱ्या सामन्यात त्याला संघाबाहेर बसवणार अशी चर्चा होती. मात्र संघाने रिषभ पंतवर विश्वास दाखवला आणि तिसऱ्या सामन्यासाठी त्याला संघात स्थान दिलं.

रिषभ पंतने आपल्या कर्णधाराचा आणि संघ व्यवस्थापनाचा विश्वास सार्थ ठरवला. तिसऱ्या टी-२० सामन्यात त्याने चार चौकारांसह ६५ धावांची खेळी केली. भारतीय संघाच्या विजयाचा त्याचा सिंहाचा वाटा होता.

विराट कोहलीकडून पंतचं कौतुक-

भारत रिषभ पंतला भविष्य म्हणून पाहतो. पंतच्या जवळ चांगली शैली आणि प्रतिभा आहे. त्याला काही वेळ देण्याची गरज आहे, जेणेकरून तो दबावाशिवाय चांगला खेळ करु शकेल. त्यानं जशी सुरूवात केली होती, त्यापेक्षा तो खूप पुढे आला आहे- विराट कोहली, भारतीय संघाचा कर्णधार

महत्वाच्या बातम्या-

-पाक लष्कराला भारतावर हल्ला करण्याचा आदेश द्यावा का?; इम्रान खान यांचा सवाल

-माजी खासदार चंद्रकांत खैरेंची आता नवी भविष्यवाणी

-राज्यसभेनंतर लोकसभेतही जम्मू काश्मीर पुनर्रचना विधेयक मंजूर

-“भाजपने स्वत:च्या आनंदासाठी घटनात्मक वचनाचा घात केला”

-“‘नाच्या’चं काम तुमचं नाही, तुम्ही पाण्याचं बघा”