खेळ

रोहित शर्मा भारतीय संघाला विदेशात सोडून भारतात परतला!

मुंबई |  सेमीफानलमध्ये न्यूझीलंडने भारताचा 18 धावांनी पराभव केला. भारताचं जग्गजेत्ता होण्याचं स्वप्न भंगलं. याचबरोबर भारताचं विश्वचषकातलं आव्हान संपुष्टात आलं आहे. यानंतर भारताचा उपकर्णधार रोहित शर्मा भारतीय संघाला विदेशात सोडून मायदेशी परतला आहे.

मुंबई विमानतळावर रोहित शर्मा त्याच्या पत्नी आणि मुलीसह दिसला. भारतीय संघाचे दुसरे खेळाडू रविवारी भारतात परतणार आहेत.

विश्वचषकात प्रवास संपलेला भारतीय संघ परतीच्या प्रवासाला निघाला होता मात्र भारतीय संघासमोर एक वेगळाच प्रश्न निर्माण झाला आहे. भारतीय संघ मायदेशी निघाला पण त्यांचे भारतात परतण्यासाठीचे तिकीट बुक न झाल्याने त्यांना वर्ल्डकपच्या शेवटच्या सामन्यापर्यंत इंग्लंडमध्ये राहावं लागणार आहे. आज भारतीय संघ भारतासाठी रवाना होणार आहे.

वर्ल्ड कपच्या सेमी फायनलमध्ये न्यूझीलंडकडून पराभव झाल्यानंतर टीम इंडिया मॅनचेस्टरमध्येच आहे. तिकीट मिळायला उशीर होत असल्यामुळे टीम इंडिया मॅनचेस्टरमध्येच अडकली आहे.

दरम्यान, वर्ल्डकपनंतर टीम इंडिया वेस्ट इंडिज दौऱ्यावर जाणार आहे. 3 ऑगस्टला या दौऱ्याला सुरूवात होणार आहे.

 

View this post on Instagram

 

#rohitsharma takes the drivers seat as he heads back home #viralbhayani @viralbhayani

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani) on

IMPIMP