Top news खेळ

रोहित शर्माने आयपीएलमध्ये रचला नवा रेकॉर्ड, विराट कोहलीलाही टाकलं मागे!

नवी दिल्ली | २०२० च्या मोसमातील आयपीएलचा १३ वा सामना काल झाला. हा सामना अबू धाबीच्या शेख जाएद स्टेडियममध्ये खेळला गेला. हा सामना मुंबई इंडियन्स विरुद्ध किंग्ज इलेव्हन पंजाब यांच्यात झाला.

काल झालेल्या सामन्यात मुंबई इंडियन्सने किंग्ज इलेव्हन पंजाबला ४८ धावांनी हरवले. पण हा सामना मुंबई इंडियन्सचे कर्णधार रोहित शर्मा यांच्यासाठी खूपच खास होता. कारण नुकताच आयपीएलच्या मोसमात रोहित शर्मा यांनी ५००० धावांचा टप्पा गाठला आहे.

रोहित शर्मा यांनी ५००० धावांचा ओलांडून विराट कोहली यांनाही मागे टाकले आहे. रोहित शर्मा यांनी ५००० धावांचा टप्पा विराट कोहली यांच्यापेक्षा खूपच कमी चेंडूत खेळून पार केला आहे. तरीही अजून ते सुरेश रैना यांच्या मागेच आहे.

आयपीएलमध्ये रोहित शर्मा यांनी ५००० धावांचा टप्पा ३८१७ चेंडूमध्ये पूर्ण केला आहे. यातच विराट कोहली यांनी ३८२७ चेंडूत ५००० धावांचा टप्पा पार केला आहे. रोहित शर्मा यांनी विराट कोहली यांच्या तुलनेत १० चेंडू कमी खेळूनच हा टप्पा ओलांडला आहे.

सुरेश रैना यांनी आयपीएलमध्ये ५००० धावांचा टप्पा ३६१९ चेंडूमध्ये पूर्ण केला आहे. सुरेश रैना हे सर्वात कमी चेंडूत जास्त धावा करणारे आयपीएलमधील पहिल्या क्रमांकाचे खेळाडू आहे. मुंबई इंडियन्सचे कर्णधार रोहित शर्मा आयपीएलमध्ये ५००० धावांचा टप्पा १८७ डाव खेळून पूर्ण केले आहे.

याबाबतीत विराट कोहली आणि सुरेश रैना त्यांच्या खूपच पुढे आहे. विराट कोहली यांनी सर्वात कमी डाव खेळून जास्त धावा केल्या आहे. विराट कोहली यांनी १५७ डावात ५००० धावांचा आकडा ओलांडला आहे. आयपीएलमध्ये सर्वात कमी डावात जास्त धावा करणाऱ्या खेळाडूंच्या बाबतीत विराट कोहली पहिल्या क्रमांकावर आहे.

आयपीएलमध्ये सुरेश रैना यांनी १७३ डावात ५००० धावांचा टप्पा ओलांडला आहे. सुरेश रैना कमी डावांमध्ये जास्त धावा करण्याच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्याचबरोबर आता तिसऱ्या स्थानावर रोहित शर्मा आहे.

आयपीएलच्या मोसमात रोहित शर्मा यांनी २५०० धावांचा टप्पा ९० डावात पूर्ण केला आहे तर पुढील २५०० धावांचा टप्पा पूर्ण करायला ९७ डाव खेळून पूर्ण केले. रोहित शर्मा यांनी ५० पेक्षा जास्त धावा ३९ वेळा केल्या आहे आणि यात त्यांनी सुरेश रैना यांची बरोबरी केली आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

अंकिता लोखंडेनं शेअर केला ‘हा’ व्हिडीओ, सुशांतच्या चाहत्यांनी केलं जोरदार ट्रोल

बिग बॉसच्या सर्वात महागड्या स्पर्धकांमध्ये राधे माँ; रक्कम ऐकून डोळे पांढरे होतील!

करण जोहरसह डझनभर कलाकारांचं टेंशन वाढलं, ‘या’ प्रकरणात नव्याने होणार चौकशी?

भारताचा ‘हा’ युवा खेळाडू तळपला; विराट-रोहितचा तुफानी फिफ्टीचा रेकॉर्ड तोडला

तो अशक्यप्राय विजय कसा मिळवला???; दिनेश कार्तिकनं सांगितली राज की बात!