“तुम्ही थोडं शांत रहा, विराट नक्की चांगली कामगिरी करेल”

नवी दिल्ली | भारतीय क्रिकेट संघ सध्या मोठ्या बदलातून जात आहे. भारतीय क्रिकेट संघाला जागतिक स्तरावर लौकिकाला साजेसा खेळ दाखवता आला नाही. परिणामी संघावर जोरदार टीका होत आहे.

भारतीय संघाची कमान आपल्या खांद्यावर प्रदिर्घ काळ सांभाळणारा भारताचा माजी कर्णधार विराट कोहलीनं सर्व प्रकारच्या संघाच्या कर्णधारपदाचा राजीनामा दिल्यानं सर्व गोंधळ सुरू झाला होता. अशात आता वेस्ट इंडिजविरूद्धच्या टी-ट्वेंटी मालिकेआधी संघ अडचणीत सापडला आहे.

विराटच्या राजीनाम्यानंतर भारतीय संघाच्या कर्णधारपदी रोहित शर्माची निवड करण्यात आली. पण काही दिवसांपूर्वी झालेल्या दक्षिण आफ्रिका संघाविरोधातील मालिकेत भारतीय संघाला सपाटून मार खावा लागला आहे.

भारतीय संघाच्या यशात विराट कोहलीचा मोठा वाटा राहिलेला आहे. विराट हा सर्वकालिन महान फलंदाजांच्या यादीत समावेश असलेला फलंदाज आहे. सध्या मात्र विराट आपल्या फाॅर्मात नाही.

विराट कोहलीच्या फाॅर्मबद्दल भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माला विचारण्यात आल्यावर रोहितनं स्पष्टीकरण दिलं आहे. विराट हा सर्वोत्तम फलंदाज असल्याचं रोहित म्हणाला आहे.

विराट कोहली दबावात कसं खेळायचं हे माहित असणारा खेळाडू आहे. परिणामी विराट लवकरच दमदार प्रदर्शन करताना पाहायला मिळेल, असं रोहित म्हणाला आहे.

विराटच्या फाॅर्मबद्दल सर्वकाही बाहेर बोलण्यात येत आहे. ते बरोबर नाही. आम्हाला विश्वास आहे तुम्ही थोडं शांत राहिलात तर विराट चांगली कामगिरी करेल, असं म्हणत रोहितनं प्रसारमाध्यमांना शांत राहण्याचा सल्ला दिला आहे.

विराटला आत्मविश्वासाची गरज आहे असं आपण कशाचा आधारावर म्हणू शकता. विराटबाबत आम्हाला कसलीही काळजी करण्याची गरज नाही, असंही रोहित म्हणाला आहे.

महत्त्वाच्या बातम्या – 

युक्रेन-रशिया संघर्ष टोकाला! हल्ला होण्याची भीती असताना रशियाने केली ‘ही’ मोठी घोषणा

“ईडीच्या कार्यालयात रोज दही-खिचडी खातो, याच्या बापाचं राज्य आहे का इथं?”

“सरकार पाडण्याचा प्रयत्न झाला तर…”; संजय राऊत यांचा भाजपला मोठा इशारा

“तो जो कोण बोलतोय दलाल, ज्याला मराठीत भडवा म्हणतात”

‘शेती इकायची नसती वो, राखायची असती’; प्रविण तरडेंनी शेअर केला वडिलांसोबतचा व्हिडीओ