रोहित शर्माची कमाल, मुंबई इंडियन्ससाठी केला ‘हा’ जबरदस्त कारनामा

नवी दिल्ली | २०२० च्या आयपीएल मोसमातील १३ वा पर्व चालू आहे. कालचा सामना अबू धाबीतील शेख जाएड स्टेडियममध्ये खेळला गेला. हा सामना दिल्ली कॅपिटल्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यात पार पडला.

आयपीएलच्या इतिहासात सर्वात यशस्वी खेळाडू आणि सर्वात यशस्वी कर्णधार म्हणून एका खेळाडूची ओळख आहे. त्या खेळाडूचे नाव रोहित शर्मा आहे. रोहित शर्मा यांनी रविवारी अजून मुंबई इंडियन्ससाठी एक मानाचा तुरा रोवला आहे.

मुंबई इंडियन्स संघासाठी रोहित शर्मा यांनी आयपीएलच्या करिअरमध्ये १५० पेक्षा अधिक सामने खेळणारा पहिला भारतीय आणि संघासाठी दुसरा खेळाडू ठरला आहे. याआधी मुंबई इंडियन्स संघासाठी किरण पोलार्ड यांनी सर्वात जास्त सामने खेळले आहे.

रविवारी दिल्ली कॅपिटल्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यात सामना पार पडला. जेव्हा रोहित शर्मा यांनी सामना खेळण्यासाठी मैदानात पाऊल टाकले तेव्हाच त्यांनी हा विक्रम केला. असा विक्रम करणारे रोहित शर्मा हे दुसरे क्रिकेटर ठरले आहे.

रोहित शर्मा यांच्या आधी अष्टपैलू खेळाडू किरण पोलार्ड यांनी १५० सामने खेळले आहे. किरण पोलार्ड यांनी हा २०२० च्या आयपीएल पर्वाच्या सुरवातीलाच हा आकडा गाठला आहे. किरण पोलार्ड हे २०१० पासून मुंबई इंडियन्स संघासाठी आयपीएल सामने खेळत आहे.

बरोबर एका वर्षानंतर म्हणजेच २०११ पासून रोहित शर्मा मुंबई इंडियन्स संघासाठी आयपीएल सामने खेळत आहे. रोहित शर्मा यांनी आपल्या आयपीएल खेळण्याची सुरवात २००८ मध्ये केली होती.

त्यानंतर २००९ मध्ये रोहित शर्मा यांनी त्या संघासोबत आयपीएल जिंकली होती. गोलंदाज रोहित शर्मा यांनी हैदराबाद संघासाठी हॅट्रिक घेतली होती. यानंतर २०११ पासून रोहित शर्मा मुंबई इंडियन्स संघासोबत जोडले गेले. २०१३ मध्ये रोहित शर्मा यांना संघाने कर्णधार म्हणून नियुक्त केले.

तेव्हापासून रोहित शर्मा यांचेच नाही तर मुंबई इंडियन्स संघाचाही चेहरामोहरा बदलला. २०१३ पासून मुंबई इंडियन्स संघाचे कर्णधारपद सांभाळत आहे. त्याच वर्षी मुंबई इंडियन्स संघाने आयपीएलचे विजेतेपद जिंकले होते, जो सचिन तेंडुलकर यांचा अखेरचा सामना होता.

त्यानंतर रोहित शर्मा कर्णधार असताना २०१५, २०१७, २०१९ वर्षातील आयपीएलचे विजेतेपद मुंबई इंडियन्स संघाने पटकावले आहे. आता २०२० मध्ये मुंबई इंडियन्स संघाने सात सामन्यांपैकी पाच सामने जिंकले आहे. यातही संघ अग्रस्थानी आहे, यातून संघ विजेतेपदाच्या जवळ जाताना दिसत आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

लवकरच येणार टाटा मोटर्सची सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक हॅचबॅक गाडी, किंमत ऐकून थक्क व्हाल..!

भाजपला मोठा झटका! एकनाथ खडसे भाजपला राम राम ठोकत ‘या’ पक्षाचा झेंडा हाती घेणार?

जगभरातील 150 मॉडेल्सची गुप्तरोग चाचणी करत सौदीच्या प्रिन्सनं त्यांना ‘हे’ काम करायला लावलं होतं!

‘…म्हणून एकनाथ खडसे यांनी मला राष्ट्रवादीत पाठवले’; भाजपच्या ‘या’ माजी आमदारानं केला गौप्यस्फोट

‘या’ पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यास नरेंद्र मोदींसह उद्धव ठाकरे देखील उपस्थित राहणार!