RRB Technician Recruitment 2024 l रेल्वे तंत्रज्ञ भरती प्रक्रिया सुरू होण्याची वाट पाहणाऱ्या उमेदवारांसाठी आनंदाची बातमी आहे. भारतीय रेल्वेच्या विविध रेल्वे झोनमध्ये तंत्रज्ञ ग्रेड-1 सिग्नल (1100 पदे) आणि तंत्रज्ञ ग्रेड-3 (7900 पदे) च्या एकूण 9 हजार पदांची भरती जाहीर केली आहे. या तंत्रज्ञ भरतीची अर्ज प्रक्रिया उद्यापासून म्हणजेच शनिवार, 9 मार्चपासून सुरू करणार आहे. RRB ने तंत्रज्ञ भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 8 एप्रिल 2024 घोषित केली आहे.
अर्ज कुठे आणि कसा करायचा? :
RRB द्वारे रेल्वे तंत्रज्ञ भर्ती 2024 साठी अर्ज करण्यास इच्छुक उमेदवार त्यांच्या क्षेत्रातील संबंधित रेल्वे भरती मंडळाच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन अर्ज करू शकतील. इकचुक उमेदवार भारतीय रेल्वेसाठी रेल्वे मंत्रालयाने तयार केलेल्या 21 रेल्वे भर्ती बोर्डांपैकी कोणत्याही अधिकृत वेबसाइटला भेट देऊन अर्ज करू शकता.
RRB Technician Recruitment 2024 l परीक्षा शुल्क किती असणार :
रेल्वे तंत्रज्ञ भर्तीसाठी अर्ज करताना उमेदवारांना ऑनलाइन माध्यमातून 500 रुपये विहित शुल्क भरावे लागेल. तसेच SC, ST, दिव्यांग, तृतीय लिंग, अल्पसंख्याक, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक तसेच सर्व श्रेणीतील महिला उमेदवारांसाठी शुल्क फक्त 250 रुपये आहे.
सर्वात महत्वाचं म्हणजे उमेदवारांनी हे लक्षात घ्यावे की, जर ते पहिल्या टप्प्यात घेण्यात येणाऱ्या संगणक आधारित चाचणी (CBT) मध्ये हजर झाले तर त्यांना 400 रुपये परतावा दिला जाईल, जो संपूर्ण शुल्काचा परतावा आहे.
RRB Technician Recruitment 2024 l हे आहेत रेल्वे भरतीचे 21 बोर्ड :
रेल्वे भर्ती बोर्ड अहमदाबाद
रेल्वे भर्ती बोर्ड अजमेर
रेल्वे भर्ती बोर्ड अलाहाबाद
रेल्वे भर्ती बोर्ड बंगलोर
रेल्वे भर्ती बोर्ड भोपाळ
रेल्वे भर्ती बोर्ड भुवनेश्वर
रेल्वे भर्ती बोर्ड बिलासपूर
रेल्वे भर्ती बोर्ड चंदीगड
रेल्वे भर्ती बोर्ड चेन्नई
रेल्वे भर्ती बोर्ड गोरखपूर
रेल्वे भर्ती बोर्ड गुवाहाटी
रेल्वे भर्ती बोर्ड जम्मू
रेल्वे भर्ती बोर्ड कोलकाता
रेल्वे भर्ती बोर्ड मालदा
रेल्वे भर्ती बोर्ड मुंबई
रेल्वे भर्ती बोर्ड मुझफ्फरपूर
रेल्वे भर्ती बोर्ड पाटणा
रेल्वे भर्ती बोर्ड रांची
रेल्वे भर्ती बोर्ड सिकंदराबाद
रेल्वे भर्ती बोर्ड सिलीगुडी
रेल्वे भर्ती बोर्ड त्रिवेंद्रम
News Title : RRB Technician Recruitment 2024
महत्त्वाच्या बातम्या-
आजपासून सलग 3 दिवस बँका आणि शेअर बाजार बंद राहणार! पाहा मार्च महिन्यातील सुट्ट्यांची यादी
भगवान महादेवाला प्रिय आहेत या वनस्पती; भोलेनाथ होईल प्रसन्न
केंद्र सरकारने महिलांना दिली खास भेट! गॅस सिलिंडर तब्बल ‘एवढ्या’ रुपयांनी केला स्वस्त
आजचे राशिभविष्य! या राशीच्या व्यक्तींवर भोलेनाथ प्रसन्न होणार; मिळणार आनंदाची बातमी
आंतरराष्ट्रीय महिला दिन 8 मार्चलाच का साजरा केला जातो? जाणून घ्या यावर्षीची थीम