10 रुपयांच्या ‘या’ शेअरने गुंतवणूकदारांना केलं मालामाल; लाखाचे झाले 32लाख

नवी दिल्ली | पैसे गुंतवायचे असतील तर तुम्ही पेनी स्टॉक (Penny Stock) मध्ये गुंतवणूक करू शकता. हे स्टॉक खूप स्वस्त असतात आणि त्यांचे बाजार मूल्य कमी असतं. अनेक मल्टीबॅगर शेअर्सनी गुंतवणूकदारांना चांगला परतावा दिला आहे.

शेअर बाजारात अलीकडेच आलेल्या तेजीनंतर रिअल इस्टेट शेअर्समध्येही तेजी पाहायला मिळाली. या दरम्यान राधे डेव्हलपर्सचा (Radhe Developers Share) शेअर मल्टीबॅगर ठरला. या स्टॉकने गेल्या 6 महिन्यांत चांगली कामगिरी केली आहे.

आठवड्यात राधे डेव्हलपर्सच्या शेअरची किंमत 309.60 रुपयांवरून 338 रुपयांपर्यंत वाढली आहे. या कालावधीत कंपनीच्या शेअर्समध्ये 9 टक्क्यांनी वाढ झाली आहे. गेल्या एका महिन्यात हा मल्टीबॅगर स्टॉक 190 रुपयांवरून 338 रुपयांपर्यंत वाढला आहे.

गेल्या 6 महिन्यांत, हा मल्टीबॅगर पेनी स्टॉक 10.40 वरून 338 रुपयांपर्यंत वाढला आहे. या कालावधीत सुमारे 3,150 टक्क्यांनी वाढ नोंदवण्यात आली.

एखाद्या गुंतवणूकदाराने एका आठवड्यापूर्वी या मल्टीबॅगर स्टॉकमध्ये 1 लाख रुपयांची गुंतवणूक केली असती तर आज त्याचे 1 लाख रुपये 1.09 लाख झाले असते. त्याचप्रमाणे एखाद्या गुंतवणूकदाराने महिन्याभरापूर्वी या शेअरमध्ये 1 लाख रुपये गुंतवले असते, तर आज त्याचे 1 लाख रुपये 1.77 लाख रुपये झाले असते.

दरम्यान, पेनी स्टॉक्स साधारणपणे ₹25 च्या खाली असते, ज्यामुळे ते गुंतवणूकदारांसाठी खूप आकर्षक ठरतात. मात्र या शेअर्समध्ये जोखीम तितकीच जास्त आहे. मात्र अनेक पेनी स्टॉक्सनी गुंतवणूकदारांना चांगला परतावा दिला आहे.

पेनी स्टॉक खूप स्वस्त असतात त्यामुळे त्यात सहज गुंतवणूक करता येते. मात्र अनेकदा निवड चुकल्यामुळे तोटा होण्याचा धोका असतो. पेनी स्टॉक्समध्ये गुंतवणूक अधिक जोखमीची मानली जाते. मात्र असे काही पेनी स्टॉक्स आहेत ज्यांनी गुंतवणूकदारांना कमी वेळेत अनेक पटींने पैसे कमावून दिले आहेत.

महत्त्वाच्या बातम्या- 

Omicronच्या धोक्यामुळे केंद्र सरकारने घेतला ‘हा’ मोठा निर्णय! 

‘मी पाहिलं तेव्हा बिपीन रावत जिवंत होते…’; प्रत्यक्षदर्शीचा धक्कादायक खुलासा 

“जो घर सोडून पळाला त्याला कुटुंब म्हणजे काय ते कसं समजणार?” 

‘मौका सभी को मिलता है…’; जितेंद्र आव्हाडांचा शिवसेनेला इशारा 

‘….हे आपले संस्कार आणि संस्कृती आहे’; जितेंद्र आव्हाडांकडून संजय राऊतांना नमन