भागवतांच्या नावाने ‘नया संविधान’ पुस्तक व्हायरल; आमचा काहीही संबंध नसल्याचं संघाचं स्पष्टीकरण

नागपूर | गेल्या दोन ते तीन दिवसांपासून सोशल मीडियावर ‘भारताचं नवं संविधान’ हे पुस्तक व्हायरल होत आहे. या पुस्तकाचा संबंध राष्ट्रीय स्वयंसेवक संघासोबत जोडला जात आहे. मात्र आमचा या पुस्तकाचा काहीही संबंध नसल्याचं  स्पष्टीकरण राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने दिलं आहे.

‘नया संविधान’ हे पुस्तक हे सरसंघचालक मोहन भागवत यांनी लिहिलं असल्याचं दावा होत आहे. सरसंघचालक मोहन भागवत नवीन संविधान बनवत असल्याचा प्रचार या व्हायरल पुस्तकातून केला जातोय. मात्र या पुस्तकाचा भागवतांशी कसलाही संबंध नाही, असं संघाने म्हटलं आहे. या पुस्तकातून संघाचा बदनामीचा प्रयत्न होत आहे, असंही त्यांचं म्हणणं आहे.

सोशल मीडियावर पुस्तक व्हायरल करणाऱ्यांची चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी संघाने केली आहे. शुक्रवारी नागपूरच्या कोतवाली पोलिस स्थानकात संघाने तक्रार दाखल केली आहे.

दरम्यान, हे पुस्तक नेमकं कोण व्हायरल करतंय? आणि या पाठीमागचा नेमका त्यांचा उद्देश काय आहे? याचा शोध आणि तपास पोलिस करत आहेत.

महत्त्वाच्या बातम्या-

-राज ठाकरेंनी इरादा बदलताच जुने भिडू पक्षात परत?? या दोन महत्वाच्या नेत्यांनी घेतली भेट

-…म्हणून आमदार महेश लांडगेंच्या डोळ्यात पाणी आलं- चंद्रकांत पाटील

-लग्नाची ‘दिशा’ काय म्हणतीय? अवधूतच्या प्रश्नावर आदित्य क्लीनबोल्ड!

-भाजप प्रदेश उपाध्यक्ष आणि अजित पवार यांंची पुण्यात भेट; चर्चांना उधाण

-रोहित पवारांनी लावला थेट मोदींना फोन; म्हणाले, ‘मेरा नाम तो आपने सुना ही होगा…!’