“राहुल गांधी म्हणजे एक पार्ट टाइम राजनेते”

नवी दिल्ली | इंग्रजांच्या जुलमी राजवटीतून स्वतंत्र होऊन देशाला येत्या 15 ऑगस्ट (15 August 1947) रोजी 75 वर्षे पूर्ण होणार आहेत. त्यामुळे यंदाच्या वर्षी आपण स्वातंत्र्याचा अमृतमोहत्सव (75th Anniversary of Independence) साजरा करत आहोत.

याच पार्श्वभूमीवर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी ‘हर घर तिरंगा’ मोहीम राबविण्याचे देशाला आवाहन केले आहे. तसेच आपल्या व्हॉट्सअ‌ॅप प्रोफाईल (Whats App DP) फोटोवर देशाचा तिरंगा (Tiranga) ठेवण्यास सांगितले आहे.

त्यामुळे काँग्रेस (Congress) आणि भाजपेत्तर पक्ष भाजप (BJP) आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर (RSS) टीका करत आहेत. ज्या संघाने देशाचा स्वतंत्र दिन ‘काळा दिवस’ म्हणून पाळला आणि देशाचा राष्ट्रध्वज आपल्या शाखा आणि कार्यालयांवर कधी फडकविला नाही. ते आता तिरंगा मोहिम राबवित आहेत, असे काँग्रेसने म्हटले आहे.

राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी भाजपची मातृसंस्था असलेल्या संघावर गेल्या 52 वर्षात देशाचा राष्ट्रध्वज (National Flag) त्यांनी न वापरल्याचे म्हटले होते आणि आता त्यांचेच नेते तिरंगा नाचवत आहेत, असे म्हटले होते.

त्यांच्या या वक्तव्यावर भाजप नेते प्रल्हाद जोशी (Pralhad Joshi) यांनी त्यांना प्रत्युत्तर दिले आहे. राहुल गांधी हे अर्धवेळ राजकारणी आहेत, त्यांच्या टीकेला आणि टीपण्णीला गांभीर्याने घेण्याची गरज नाही. संघाच्या विचारधारेला पूर्ण देशाने स्वीकराले आहे, असे जोशी म्हणाले.

प्रल्हाद जोशी यांनी यासंबंधी एक व्हिडिओ ट्विट केला आहे. ट्विट करत त्यांनी गांधींना प्रत्युत्तर दिले आहे.

राहुल गांधी हे एक अर्धवेळ राजकारणी आहेत. त्यांनी संघाच्या विचारधारेवर केलेल्या वक्तव्याला गंभीरतेने घेण्याची गरज नाही. संघ आणि संघाच्या विचारधारेला संपूर्ण देशाने स्वीकारले आहे. जी काँग्रेस देशाला स्वातंत्र्य दिल्याचे रिकामे दावे करत आहे, त्यांची आज काय हालत आहे? आपण सर्व पाहतच आहोत, असे प्रल्हाद जोशी म्हणाले.

महत्वाच्या बातम्या – 

राऊत दांपत्याची एकत्र चौकशी होणार, वर्षा राऊत यांना ईडीचं समन्स

मंगळसूत्र गळ्यात असलं की नवऱ्याने गळा पकडल्यासारखं वाटतं त्यामुळे मी….- अमृता फडणवीस

पक्षाच्या चिन्हाबाबत सर्वोच्च न्यायालयाची शिंदे गटाला महत्त्वाची सूचना!

‘आम्ही नरेंद्र मोदींना घाबरत नाही’, हेराल्ड हाऊससंबंधी कारवाईनंतर राहुल गांधी आक्रमक

‘गुजरात दंगलीतून नरेंद मोदींना…’; उद्धव ठाकरेंचं मोठं वक्तव्य