“2002 लोकसभा निवडणुकीपूर्वी संघाचा देशात बॉम्बस्फोट करण्याचा कट होता”; माजी प्रचारप्रमुखाचा मोठा दावा

नवी दिल्ली | 2004 साली लोकसभा निवडणुका होण्याअगोदर देशभरात बॉम्बस्फोट (Bomb blast) करण्याचा डाव राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा होता, असा खळबळजनक खुलासा संघटनेत प्रचारक म्हणून काम केलेल्या यशवंत शिंदे (Yashwant Shinde) यांनी केला आहे.

त्यांच्या या दाव्याने आता मोठी खळबळ उडाली आहे. शिंदे हे 1995 पासून संघात प्रचारक म्हणून काम करत आहेत. शिंदे यांचा एक व्हिडिओ काँग्रेसचे नेते पवन खेरा (Pawan Khere) यांनी ट्विटरवर प्रसारीत केला आहे.

त्यांनी ट्विट करत या मुद्द्याला हात घातला आहे. हा व्हिडिओ शेअर करत पवन खेरा यांनी देशाविरोधात कट रचणाऱ्या प्रत्येकाल कठोर शिक्षा झाली पाहिजे अशी मागणी केली आहे.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (RSS) प्रचारकाने दिलेल्या कबुलीजबाबामुळे संघाच्या देशविरोधी कार्यांसंदर्भात धक्कादायक माहितीवर प्रकाश टाकला आहे. संपूर्ण देशामध्ये बॉम्बस्फोट घडवून आणले जाणार होते, त्यात कोणकोण सहभागी आहेत, याहून मोठी ब्रेकिंग न्यूज काय असू शकते, असा प्रश्न पवन खेरा यांनी उपस्थित केला आहे.

यावेळी संघाचे माजी प्रचारक यंशवंत शिंदे यांंनी संघाकडून केल्या जाणाऱ्या देशाविरोधातील कारवायांबद्दल एक उच्चस्तरीय समिती नेमून चौकशी झाली पाहिजे. निवडणुका जिंकण्यासाठी देशाविरोधात कट रचणारे राष्ट्रवादी नसतात, असे शिंदे म्हणाले.

सध्या केंद्रात भाजपचे सरकार आहे. त्यामुळे त्यांची मूळ पितृसंस्था आरएसएस (RSS) असताना, ते त्यांच्याविरोधात मोठी कारवाई करणार का, हे पाहणे आगामी काळात महत्वाचे ठरणार आहे.

तसेच यशवंत शिंदे यांनी केेलेल्या दाव्यांत आणि आरोपांमध्ये सत्य आहे का, की केवळ त्यांनी संघाला बदनाम करण्यासाठी आरोप केले आहेत, हे आगामी काळात पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

महत्वाच्या बातम्या –

“मनीष सिसोदियांना अटक केली, तर आम्ही गुजरातमध्ये…” अरविंद केजरीवाल यांचा दावा

“बाळासाहेब ठाकरे यांचा मुलगा असल्याचे सांगून किती दिवस…”; रामदास कदमांची उद्धव ठाकरेंवर मोठी टीका

“शहाजी बापू पाटील पन्नास खोक्यांतून तुमच्या बायकोला…”; युवासेनेची बापुंना प्रतिक्रिया

काँग्रेसचा नवीन अध्यक्ष महाराष्ट्रातून? नाना पाटोलेंसह ‘या’ नेत्यांच्या नावाची चर्चा

कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांच्या मेळघाट दौरा गाजतोय, फोटो सोशल मिडियावर व्हायरल