Ruby Hall-Ramwadi Metro l पुणेकरांसाठी एक आनंदाची बातमी आहे. पुणे मेट्रोच्या रुबी हॉल क्लिनिक ते रामवाडी या भागातीळ मेट्रोचे उद्घाटन होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीने उदघाटन सोहळा संपन्न होणार आहे. यापूर्वी या प्रकल्पाचे उद्घाटन 19 फेब्रुवारीला होणार होते. परंतु काम पूर्ण न झाल्यामुळे हे उदघाटन आज 6 मार्चला होत आहे.
Ruby Hall-Ramwadi Metro l पुणेकरांनी अखेर सुटकेचा नि:श्वास सोडला :
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पुणे मेट्रोच्या रुबी हॉल क्लिनिक ते रामवाडी या भागाचे उद्घाटन होणार असल्यामुळे पुणेकरांनी अखेर सुटकेचा नि:श्वास सोडला आहे. यासोबतच पंतप्रधान पिंपरी-चिंचवड महापालिका (पीसीएमसी) ते निगडी (भक्ती शक्ती चौक) या मार्गाचे भूमिपूजनही ते करणार आहेत.
पुणे मेट्रोचे संचालक अतुल गाडगीळ म्हणाले की, “पंतप्रधान नरेंद्र मोदी 6 मार्च रोजी सकाळी 11.30 वाजता कोलकाता येथून व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे या मार्गाचे उद्घाटन करतील. हिरवा झेंडी दाखवल्यानंतर रुबी हॉल ते रामवाडी आणि उलट अशा दोन मेट्रो ट्रेन धावणार असून रुबी हॉल मेट्रो स्टेशनवर हा सोहळा होणार आहे.
Ruby Hall-Ramwadi Metro l उद्घाटनानंतर दोन तासांनी प्रवासी सेवा सुरू होणार :
पुणे मेट्रोचे कार्यकारी संचालक हेमंत सोनवणे म्हणाले की, “उद्घाटनानंतर दोन तासांनी प्रवासी सेवा सुरू होईल. दुपारी एकच्या सुमारास रुबी हॉलच्या आधी मेट्रो रामवाडीकडे रवाना होईल. रुबी हॉल ते रामवाडी हे अंतर 5.5 किलोमीटर आहे. उद्घाटनानंतर पुणे मेट्रो वनाझ ते रामवाडी हे 15.7 किलोमीटर अंतराची लाईन 2 पूर्ण करेल.
पुणे मेट्रोच्या उद्घाटनानंतर त्याच दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या (PCMC) स्वारगेट ते PCMC पर्यंत पुणे मेट्रो लाईन-1 कॉरिडॉरच्या निगडी विस्तारित भागाच्या कामाचे उद्घाटनही होणार आहे.
News Title : Ruby Hall-Ramwadi Metro Opening
महत्त्वाच्या बातम्या-
आजचे राशिभविष्य! या राशीच्या व्यक्तींनी तब्बेतीची काळजी घ्यावी
‘मी कोणालाही त्रास देत नाही, आधी त्यांनी…’; मनोज जरांगे पाटलांचा मोठा गौप्यस्फोट
“छात्या दुखल्या तरी पण…”; जरांगेंच्या वक्तव्याने एकच खळबळ
‘उद्या अंतरवाली सराटीमध्ये…’; मराठा आंदोलनाबाबत जरांगेंची सर्वात मोठी घोषणा!
शिवभक्तांसाठी आनंदाची बातमी; महाशिवरात्रीला विशेष रेल्वे धावणार,पाहा वेळापत्रक