1 मार्चपासून नियमांत मोठे बदल होणार; नागरिकांच्या खिशावर होणार थेट परिणाम

Rule Change From 1st March 2024 l आज फेब्रुवारी महिन्याचा शेवटचा दिवस आहे. अगदी काही तासांनंतर वर्षाचा नवीन मार्च महिना सुरू होणार आहे. वास्तविक, प्रत्येक महिन्याच्या 1 तारखेला नियमांत बदल होत असतात. त्यामुळे आता 1 मार्चपासून नियमांत बदल होणार आहेत. मात्र नेमके कोणते बदल होणार आहेत आणि त्याचा सर्वसामान्यांच्या खिशावर काय परिणाम होणार ते आपण पाहुयात.

Rule Change From 1st March 2024 l फास्टॅग केवायसीचा आज शेवटचा दिवस :

फास्टॅग केवायसीचा आज शेवटचा दिवस आहे. त्यामुळे आजच तुम्हाला तुमच्या फास्टॅगचे KYC पूर्ण करावे लागणार आहे. भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने (NHAI) तीनचाकी आणि चारचाकी वाहनांवर फास्टॅगचे KYC अनिवार्य केले आहे. त्याची केवायसी करण्याची अंतिम तारीख 29 फेब्रुवारी 2024 दिली आहे. जर तुम्ही तुमच्या फास्टॅगचे KYC केले नसेल तर ते काम लवकरात लवकर पूर्ण करावे.

एलपीजी सिलिंडर स्वस्त होण्याची शक्यता :

देशातील सार्वत्रिक निवडणुका कधीही जाहीर होऊ शकतात. अशा परिस्थितीत देशातील सर्वसामान्य जनतेला यावेळी त्याचा लाभ मिळू शकतो. एलपीजी घरगुती सिलिंडरची किंमत अजूनही खूप जास्त आहे. त्यामुळे यावेळी पेट्रोलियम कंपन्या निश्चितपणे घरगुती सिलिंडरच्या दरात कपात करतील असा अंदाज वर्तवला जात आहे. मात्र याबाबतची कोणतीही अधिकृत घोषणा अद्याप झालेली नाही.

Rule Change From 1st March 2024 l जीएसटीचे नवीन नियम लागू होणार :

केंद्र सरकार GST नियमांमध्ये मोठा बदल करत आहे (GST Rules Changing from 1 march 2024). आता 5 कोटींहून अधिक व्यवसाय करणाऱ्या व्यावसायिकांना ई-इनव्हॉइसशिवाय ई-वे बिल तयार करता येणार नाही. हा नियम 1 मार्च 2024 पासून लागू होणार आहे.

सोशल मीडिया :

सरकारने अलीकडेच आयटी नियम बदलले आहेत. यानंतर X, Facebook, YouTube आणि Instagram या सोशल मीडिया ॲप्सना हे नियम पाळावे लागतील. मार्च महिन्यापासून सोशल मीडियावर चुकीच्या माहितीसह कोणतीही बातमी प्रसारित झाल्यास त्यासाठी दंड आकारला जाईल. यातून सोशल मीडिया सुरक्षित करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे.

News Title : Rule Change From 1st March 2024

महत्त्वाच्या बातम्या-

मार्चमध्ये लाँग वीकेंडच नियोजन करताय तर या ठिकाणांना भेट द्या!

“…त्यांच्या शब्दापुढं मी जात नाही”, मनोज जरांगेंनी केलं मोठं विधान!

मोठी बातमी! मनोज जरांगेंचं एक पाऊल मागे, अखेर….

या महिला क्रिकेटरने चक्क मुंबई इंडियन्सला चारली पराभवाची धूळ

गुड न्यूज! दीपिका पदुकोण आई होणार, ‘या’ महिन्यात होणार डिलिव्हरी