मोठी बातमी! शिवजयंतीच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने घेतला महत्वाचा निर्णय!

मुंबई | कोरोना महामारीमुळे राज्यात निर्बंध लावण्यात आले होते. आता रूग्णसंख्या कमी होत असताना निर्बंध देखील शिथील करण्यात आले आहेत.

अशातच आता शिवजयंती (Shivjayanti 2022) उत्सवाबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी निर्देश जारी केले आहेत. गृह विभागाच्या प्रस्तावाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज मंजुरी दिली.

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त आयोजित करण्यात येणाऱ्या शिवज्योत दौडीत 200 जणांना परवानगी असणार आहे. तर जन्मोत्सव सोहळ्यासाठी देखील निर्बंध लावण्यात आले आहेत.

जन्मोत्सव सोहळ्यासाठी फक्त 500 जणांना मंजुरी देण्यात आली आहे. सर्वांनी आरोग्य नियमावलीचं पालन करून सोहळा साजरा करावा, असं उद्धव ठाकरे म्हणाले आहेत.

सर्वांनी आरोग्याची आणि स्वच्छतेची काळजी घ्यावी, असं आवाहन देखील त्यांनी यावेळी केलं आहे. गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी शिवज्योत आणि जन्मोत्सव सोहळा विशेष बाब असल्याचं म्हटलं होतं.

मागील दोन वर्षापासून शिवजयंतीवर कोरोनामुळे निर्बंध लावण्यात आले होते. त्यामुळे शिवप्रेमींमध्ये आनंदाचं वातावरण होतं. अशातच आता शिवप्रेमींना काहीसा दिलासा मिळल्याचं पहायला मिळतोय.

दरम्यान, शिवजयंती उत्सवासाठी विविध किल्ल्यांवरून शिवज्योती वाहून आणण्यात येतात. त्यासाठी आता शिवप्रेमी आतुर झाले आहेत.

महत्त्वाच्या बातम्या – 

कुडाळमध्ये शिवसैनिक आणि राणे समर्थकांमध्ये तुफान राडा, पोलीस घटनास्थळी दाखल

Valentine’s Day | ‘तु माझा आहेस’; मलायकाने शेअर केला अर्जुनसोबतचा रोमॅन्टिक फोटो

 “काँग्रेस बुडवण्यासाठी इतर कुणाचीही गरज नाही, राहुल-प्रियांकाच पुरेसे आहेत”

‘आय रिपीट, भाजपचे साडे तीन नेते…’; संजय राऊतांच्या नव्या दाव्याने खळबळ 

डॉ. सुवर्णा वाजे प्रकरणी आणखी एक धक्कादायक खुलासा समोर