विद्याताईंची राजकीय प्रतिमा खराब व्हावी म्हणून या भानगडी होतायेत- रूपाली चाकणकर

मुंबई |  राष्ट्रवादी काँग्रेसच्या विधान परिषदेतील आमदार विद्या चव्हाण यांच्याविरुद्ध सूनेचा छळ केल्याच्या आरोपाप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विलेपार्ले पोलीस ठाण्यात छळाबाबत पीडित सूनेकडून तक्रार दाखल करण्यात आली आहे. मात्र विद्या चव्हाण यांनी हे सगळे आरोप फेटाळले आहेत. यावरच राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.

चव्हाण कुटुंब हे सुशिक्षित आहे. ते कुटुंब असं करणार नाही. विद्याताईंची केवळ राजकीय प्रतिमा खराब करण्यासाठी हे सगळं होत असल्याचं रूपाली चाकणकर म्हणाल्या आहेत. तसंच जे सत्य असेल ते बाहेर येईलच, असंही त्या म्हणाल्या आहेत.

माझ्या सुनेचे विवाहबाह्य संबंध आहेत. हे कळल्यानंतर माझ्या मुलानं घटस्फोट घेण्याची तयारी सुरू केली. तेव्हा सुनेनं छळाचे आरोप केले आहेत. मात्र, हे सर्व आरोप खोटे असून न्यायालयात सर्व सिद्ध होईल, असं विद्या चव्हाण यांनी म्हटलं आहे.

माझ्या सुनेच्या मोबाइलवर काही आक्षेपार्ह मेसेज आढळले. तिचे विवाहबाह्य संबंध असल्याचं त्यातून समोर आलं. त्यामुळे माझ्या मुलाने वेगळं होण्याचा निर्णय घेतला. आपल्या सगळ्या गोष्टी उघड झाल्याचं पाहून तिनं वकीलाचा सल्ला घेऊन चुकीचा आरोप केला आहे, असंही त्या म्हणाल्या आहेत.

दरम्यान, पीडित सुनेच्या तक्रारीवरुन विद्या चव्हाण यांच्यासह त्यांचे पती अभिजीत, मुलगा अजित (पीडितेचा नवरा) दुसरा मुलगा आनंद (पीडितेचा दीर) आणि शीतल (आनंद यांची पत्नी) अशा एकूण पाच जणांविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

-देशात शांतता आणि एकता गरजेची आहे- पंतप्रधान

-मुख्यमंत्री आणि जयंत पाटलांच्या वक्तव्याने मुस्लिम आरक्षण जाहीर करणाऱ्या नवाब मलिकांची गोची!

-मुस्लिम आरक्षणावर आमच्यात आणखी चर्चा झाली नाही; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचं मोठं वक्तव्य

-माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सर्वोच्च न्यायालयाचा मोठा झटका!

-“संपादकपदी रश्मी ठाकरे म्हणून सामनाची भाषा बदलणार नाही, संपादकीय राऊतांकडेच”