पुणे | मतभेद कुठेतरी मनभेदापर्यंत जायला लागले आहेत. ते जाऊ नयेत यासाठी मी प्रयत्न करतोय. पण वेगवेगळ्या माध्यमातून हे दाखवलं जातंय की आम्हाला काहीतरी वेगळं करून दाखवायचंय, असं मनसे नेते वसंत मोरे म्हणालेत.
माझं दुर्दैवं आहे की मला सारखं का सांगावं लागतंय की मी मनसेत आहे. कुणीतरी यामागे आहे. कुणीतरी या सगळ्या गोष्टी घडवून आणतं आहे, असं फेसबुक लाईव्हवरुन वसंत मोरेंनी सांगितलं.
गेल्या महिन्या-दीड महिन्यापासून मला सांगायला लागतंय की मी मनसेत आहे. हे झारीतले शुक्राचार्य शोधले पाहिजेत. त्यांच्यावर कारवाया व्हायला पाहिजेत. कोण पक्षातून कुणाला बाहेर घालवायला बघतंय त्यांच्यावर कारवाया झाल्या पाहिजे, असंही त्यांनी म्हटलं. यावर राष्ट्रवादीच्या नेत्या रूपाली पाटील ठोंबरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
किती वेळा फेसबुक लाईव्ह करुन मी मनसेत आहे हे सांगणार? वसंत भाऊ एकदा काय तो निर्णय घे, असं वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्या रुपाली ठोंबरे पाटील यांनी वसंत मोरेंना केलं आहे.
दरम्यान, राज ठाकरेंच्या पुण्यातील सभेनंतर अजूनही नाराज आहात का ? असा प्रश्न मोरे यांना विचारला असता म्हणाले, घरातली भांडणं आहेत. ती बसून मिटवायची तर बसून बोलतील आणि सर्व मिटेल. नाराज असण्याचं कारण नाही, असं वसंत मोरे म्हणालेत.
महत्त्वाच्या बातम्या-
“वसंत भाऊ तुझी राजसाहेबांना सांगण्याची कधी हिम्मत झाली नाही, आता…”
केंद्र सरकार पाठोपाठ ठाकरे सरकारनेही घेतला मोठा निर्णय!
‘तू कोण आहेस, गांधी की वल्लभभाई?’; राज ठाकरेंची उद्धव ठाकरेंवर टीका
राज ठाकरेंच्या सभेतील 10 महत्त्वाचे मुद्दे वाचा एका क्लिकवर
“मी टीका सहन करेन पण माझ्या पोरांना अडकू देणार नाही”